PUBG Mobile India Launch: 'पबजी मोबाईल' ला भारतामध्ये पुन्हा प्रवेशासाठी अद्याप केंद्र सरकारची परवानगी नाही, RTI मधून माहिती उघड
अद्यापही ते प्रतिक्षेत आहेत.
PUBG Mobile वर भारतामध्ये सप्टेंबर 2020 पासून बॅन आहे. पण पबजी भारतीय बाजारात पुन्हा एंट्री मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान मागील दिवसांपासून त्याबाबतची चर्चा रंगत आहे.मात्र अद्याप पबजी, केंद्रीय मंत्रालयाकडून त्याबाबत हिरवा कंदील मिळवण्याच्या प्रतिक्षेमध्ये आहे. Ministry of Electronics and Information Technology कडून त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. PUBG Mobile India लवकरच होणार लॉन्च; कंपनीने शेअर केला टीझर (Watch Video).
e-sports entity GEM Esports यांनी माहिती अधिकाराच्या खाली याबाबत प्रश्न विचारला असता समोर आलेल्या माहितीनुसार, पबजीला मार्केट पुन्हा प्रवेश करण्याची इच्छा आहे पण त्यासाठी आवश्यक असणारी सरकारची परवानगी त्यांना मिळालेली नाही. अद्यापही ते प्रतिक्षेत आहेत.
पबजी कॉर्परेशन कडून मागील महिन्यात घोषणा करत दिलेल्या माहितीनुसार, PUBG Mobile India हा नवा खेळ ते बाजारात आणू इच्छित आहेत. मात्र याबाबत आरटीआय टाकून जेव्हा माहिती काढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा समोर आलेला रिपोर्ट आता GEM Esports ने जाहीर केला आहे.
GEM Esports इंस्टाग्राम पोस्ट
Ministry of Electronics and Information Technology ने याप्रकरणी उत्तर देताना अद्याप पबजी इंडियाला परवानगी दिली नसल्याचं सांगितलं आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये भारत सरकारने पबजी सोबतच 117 अन्य चायनीज अॅपवर बंदी घातली आहे. त्यामध्ये Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work & WeChat यांचा समावेश आहे. पबजी हा ऑनलाईन मोबाईल खेळ तरूणाईमध्ये विशेष लोकप्रिय होता. अनेकांना त्यांचं व्य्सन जडलं होतं.