जगभरात 235 मिलियन Instagram, TikTok आणि YouTube Profiles चा डाटा लीक - रिपोर्ट
लीक झालेल्या माहितीमध्ये प्रोफाईल फोटो, नाव, वय तर काहींमध्ये फोन नंबर आणि इमेल आयडी सारखी माहिती देखील लीक झाली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार, जगभरात सुमारे 235 मिलियन इंस्टाग्राम, टिकटॉक आणि युट्युब युजर्सच्या प्रोफाईलमधील डाटा लीक झाला आहे. सोबतच त्यांची प्रोफाईल्स ही डार्क वेब साठी ग्रॅब झाली आहेत. security researchers from pro-consumer website Comparitech च्या माहितीनुसार, हा प्रकरणामध्ये अनसिक्युअर्ड डाटाबेसचा समावेश आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये प्रोफाईल फोटो, नाव, वय तर काहींमध्ये फोन नंबर आणि इमेल आयडी सारखी माहिती देखील लीक झाली आहे.
इंस्टाग्रामवरून 100 मिलियन, टिकटॉकवरून 42 मिलियन तर 4 मिलियन युट्युब प्रोफाईल अकाऊंट्सवरील माहिती जगभरातून लीक झाली आहे. फोर्ब्सने security researchers च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि युट्युबर वरील लीक प्रोफाईल मध्ये दीप सोशल या कंपनीचा समावेश आहे. दरम्यान 2018 साली फेसबूक आणि इंस्टाग्रामकडून त्यांना बॅन करण्यात आले आहे.
फेसबूक कडून दीप सोशलला कायदेशीर नोटीस पाठवत अशाप्रकारे माहिती स्रॅप करणं म्हणजे नियमांचं उल्लंघन करणं आहे असे सांगण्यात आले होते.
दरम्यान या महिन्याच्या सुरूवातीला हॅकर ग्रुप ShinyHunters मध्ये 18 कंपन्यांकडून चोरलेल्या डाटामधीमधून 386 मिलियन युजर रेकॉर्ड होते. मोफत डाऊनलोडिंग असलेल्या फोरममध्ये त्यांच्याकडून माहिती अपलोड केली जात असे.