लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाल्या OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R 5G च्या किंमती; जाणून घ्या किती रुपयांना मिळू शकेल OnePlus 9 Series चे फोन
वनप्लस इंडियाच्या अधिकृत यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया खात्यांवर तुम्ही ते पाहू शकता
उद्या, म्हणजे 23 मार्च रोजी वनप्लस 9 सिरीज (OnePlus 9 Series) भारतामध्ये लॉन्च होत आहे. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने वनप्लस 9 (OnePlus 9), वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) चे फोटो प्रसिद्ध केले आहेत. याखेरीज या फोनचे फीचर्स आणि वैशिष्ट्ये समोर आली आहेत. वनप्लस 9 सिरीजमध्ये वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आर 5 जी (OnePlus 9R 5G) चा समावेश आहे. या वेळी कंपनीने Hasselblad सोबत भागीदारी केली आहे. यामुळे या स्मार्टफोनमध्ये एक चांगला कॅमेरा व्ह्यू मिळू शकेल. या सिरीजद्वारे प्रथमच परवडणारा स्मार्टफोन वनप्लस 9 आर बाजारात आणला जात आहे.
एका वृत्तानुसार, वन प्लस 9 सिरीजमधील फोन लॉन्च होण्यापूर्वी त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाल्याची बातमी समोर येत आहे. यासह या फोनची भारतामधील किंमतही लीक झाली आहे. ट्विटरवर 'झुबिन' नावाच्या एका लीकस्टरने वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आरच्या किंमती लीक केल्या आहेत. वनप्लस 9 आरची सुरुवातीची किंमत 30,000 रुपये असेल, तर वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 फोनची किंमत अनुक्रमे 50,000 आणि 42,000 रुपये असेल. सध्या तरी या किंमती खात्रीलायक आहेत की नाही याची पुष्टी झाली नाही.
वनप्लस इंडिया उद्या वनप्लस 9 सिरीजच्या किंमती जाहीर करणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. वनप्लस इंडियाच्या अधिकृत यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया खात्यांवर तुम्ही ते पाहू शकता. यापूर्वी लीक झालेल्या फीचर्सनुसार, वनप्लस 9 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 120Hz रीफ्रेश रेट आणि रिझोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. (हेही वाचा: Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोनचा पहिला सेल येत्या 25 मार्चला, फ्लिपकार्टवर प्री-बुकिंग सुरु)
वनप्लस 9 प्रो डिव्हाइसमध्ये 327x1440 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.7 फ्ल्युड AMOLED डिस्प्ले मिळेल. वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 एसओसीसह 12 जीबी पर्यंतची रॅम आणि 256 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेजयुक्त असतील. ऑप्टिक्ससाठी, वनप्लस 9 फोनमध्ये 48 एमपीचा ट्रिपल रीअर कॅमेरा मॉड्यूल असेल तर वनप्लस 9 प्रोमध्ये 48 एमपी क्वाड रियर कॅमेरा सिस्टम असेल.