Poco X3 launched in India: 5 कॅमेरे असलेला पोकोचा नवीन स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, फ्लिपकार्टवर 'या' दिवशी होणार पहिला सेल
या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.67 इंचाची फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे जी 120 हर्टज सह येते. हा अॅनड्ऱॉईड 10 वर आधारित MIUI 12 वर काम करतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. Qualcomm Snapdragon 732G SoC मिळत आहे. यात जो Adreno 618 GPU आणि 8GB पर्यंतच्या रॅमसह येतो.
पोकोचा (Poco) नवा स्मार्टफोन Poco X3 स्मार्टफोन आज अखेर भारतात लाँच झाला आहे. 5 कॅमेरे आणि 6000mAh ची जबरदस्त बॅटरी असलेला हा स्मार्टफोनचा ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) पहिला सेल होणार आहे. हा सेल येत्या 29 सप्टेंबरला होणार आहे. हा स्मार्टफोन 3 वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात प्रत्येक 2 रंग उपलब्ध आहेत. यात 6GB रॅम (RAM) आणि 64GB स्टोरेजची (Storage) किंमत 16,999 रुपये, 6GB+128GB ची किंमत 18,999 रुपये आणि 8GB+128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Cobalt Blue आणि Shadow Grey रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.67 इंचाची फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे जी 120 हर्टज सह येते. हा अॅनड्ऱॉईड 10 वर आधारित MIUI 12 वर काम करतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. Qualcomm Snapdragon 732G SoC मिळत आहे. यात जो Adreno 618 GPU आणि 8GB पर्यंतच्या रॅमसह येतो.
हेदेखील वाचा- Poco X3 आज भारतात होणार लाँच, येथे पाहा लाईव्ह इव्हेंट
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर यात 64MP Sony IMX682 देण्यात आला आहे. यात 13MP चा वाइड एंगल लेन्स, एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एक 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स दिला आहे. फ्रंटमध्ये यूजर्सला पंच होल कटमध्ये 20MP चा लेन्स मिळत आहे. फोनमध्ये 128 जीबी पर्यंत UFS 2.1 स्टोरेज मिळतो ज्याला माइक्रो एसडी कार्ड च्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth, 4G, GPS/ A-GPS, IR Blaster, NFC, 3.5mm headphone jack, आणि USB Type-C port चार्जिंग पोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते जी 33 वॉट च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये accelerometer, gyroscope, ambient light sensor, आणि proximity sensor मिळते.
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2020 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

