Poco M3 4GB रॅम वेरिएंट भारतात झाला लॉन्च, कमी कींमतीत मिळणार दमदार फीचर्स
कंपनीने आपल्या जुन्या स्मार्टफोन पोको एम 3 चे नवीन रॅम मॉडेल भारतीय बाजारात बाजारात आणले आहेत. पोको M3 आतापर्यंत दोन स्टोरेज व्हेरिएंट 6 जीबी + 64 जीबी आणि 6 जीबी + 128 जीबी मध्ये उपलब्ध होता. पण आता त्याचे 4 जीबी रॅम मॉडेलही लाँच करण्यात आले आहे.
Poco लवकरच आपला नवीन स्मार्टफोन F3 GT भारतीय बाजारात दाखल करण्याची तयारी करत आहे. जो भारतातील कंपनीचा पहिला फ्लॅगशिप फोन असेल.हा स्मार्टफोन डायमेंसिटी 1200 वर देण्यात येणार असून यात 120Hz एमोलेड डिस्प्ले मिळेल. दरम्यान कंपनीने आपल्या जुन्या स्मार्टफोन पोको एम 3 चे नवीन रॅम मॉडेल भारतीय बाजारात बाजारात आणले आहेत. पोको M3 आतापर्यंत दोन स्टोरेज व्हेरिएंट 6 जीबी + 64 जीबी आणि 6 जीबी + 128 जीबी मध्ये उपलब्ध होता. पण आता त्याचे 4 जीबी रॅम मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. (Redmi Note 10 Pro Max वर धमाकेदार ऑफर, Amazon Prime Day 2021 मध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी )
Poco M3 च्या 4GB + 64GB स्टोरेज मॉडल ला भारतीय बाजारात 10,499 रुपयांसह लॉन्च केले गेले आहे. हा कंपनीचा बजेट रेंज स्मार्टफोन असून तो ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. दुसरीकडे, इतर मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर, 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे आणि 6 जीबी + 128 जीबी मॉडेलची किंमत 12,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि पोको यलो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.यात 6.53 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे ज्याचा स्क्रीन रिझोल्यूशन 1080 × 2340 पिक्सल आहे.
फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉचसह आला असून त्यात व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय येथे एक ट्रिपल रियर कॅमेरा आहे जो 48 MP प्राइमरी सेन्सरने सुसज्ज आहे. तर 2 MP मॅक्रो सेन्सर आणि 2 MP चे सेन्सर देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6,000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते आणि एका चार्जमध्ये दीर्घ बॅकअप देण्यास सक्षम आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)