POCO F3 GT स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह संभाव्य फिचर्स
त्यानंतर आता कंपनीचे आणखी एक डिवाइस ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच BIS वर दिसून आले आहे.
Poco कंपनीने गेल्या महिन्यात आपला पहिला 5G स्मार्टफोन POCO M3 Pro भारतीय बाजारात लॉन्च केला होता. त्यानंतर आता कंपनीचे आणखी एक डिवाइस ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच BIS वर दिसून आले आहे. ज्यामध्ये POCO F3 GT असल्याचे सांगितले जात आहे. लिस्टिंगवरुन आणखी काही माहिती देण्यात आलेली नाही. पण गिज्मोचाइनच्या रिपोर्ट्सनुसार, अपकमिंग POCO F3 GT स्मार्टफोन M2104K10C मॉडेल क्रमांकासह BIS वेबसाइटवर लिस्ट आहे. हा स्मार्टफोन 2021 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त अधिक माहिती दिली नाही.
रिपोट्सनुसार. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120HZ असणार आहे. हे डिवाइस अॅन्ड्रॉइड11 आधारित MIUI 12.5 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. यासाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. याचा पहिला 64MP प्रायमरी सेंसर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 2MP ची मॅक्रो लेन्स दिली जाऊ शकते. तर या फोनच्या फ्रंटला 16GB चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.(Reliance AGM 2021: रिलायन्स जिओकडून सर्वात स्वस्त JioPhone Next स्मार्टफोनची घोषणा; 'या' दिवशी होणार उपलब्ध)
अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. तसेच फोनमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि युएसबी पोर्ट सारखे फिचर्स मिळू शकतात. पोको एफ3 जीटीच्या भारतीय लॉन्चिंगसह फिचर्सबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनची किंमत 25-30 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.