PhonePe युजर्ससाठी खुशखबर! पेमेंट करण्यासोबत 'या' सर्विसचा लाभ घेता येणार
तर डिजिटल पेमेंटसाठी नागरिकांना विविध अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामधील एक फोन पे (Phone Pe) या अॅपच्या युजर्ससाठी खुशखबर आहे.
डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहे. तर डिजिटल पेमेंटसाठी नागरिकांना विविध अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामधील एक फोन पे (Phone Pe) या अॅपच्या युजर्ससाठी खुशखबर आहे. कंपनीने पेमेंटसेवेसोबत नवे चॅट फिचर लॉन्च करण्यात आले आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून युजर्सला कोणत्याही अन्य मेसेजिंग अॅपचा वापर न करता पैसे पाठवण्याची रिक्वेस्ट पाठवता येणार आहे.फोन पे अॅपचे कोफाऊंडर राहुल चारी यांनी असे म्हटले आहे की, त्याच्या चॅट या नव्या फिचरमुळे युजर्सला मोबाईल मध्ये असलेल्या क्रमांकावर पैसे पाठवणे सोपे होणार आहे. तसेच पैसे मिळाले असल्याची पुष्टी सुद्धा करता येणार आहे.
लवकरच फोन पे वर ग्रुप चॅटसह फोन पे चॅट बाबत अधिक काम करणार आहोत. हे फिचर आयओएस आणि अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन धारकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.गेल्या काही दिवसांपासून Paytym,PhonePe या सारख्या मोबाईल ई-सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत आहे. त्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) नवीन नियम लागू केले आहेत. (ऑनलाईन खरेदीमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी RBI चे Mobile Wallets साठी नवीन नियम लागू)
भारतामध्ये UPI पेमेंटसाठी अनेक कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा तगडी आहे. लवकरच व्हॉट्सअॅप या लोकप्रिय चॅट अॅपच्या मदतीने देखील व्यवहार करता येणार आहे. भविष्यात व्हॉट्सअॅपकडूनही UPI सेवा सुरू होण्याचा प्लॅन आहे. तर अमेझॉन युपीआयचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला बॅंक खातं, Amazon UPI सोबत लिंक करावं लागेल. त्यानंतर तुमची पैसे पाठवण्याची आणि स्विकारण्याची सोय खुली होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.