Dhanteras 2022: PhonePe कडून सोनं, चांदी खरेदीवर Golden Days Offers; मिळणार कॅशबॅक

यामध्ये सोनं खरेदी डिजिटल, कॉईन किंवा बार अशा कोणत्याही स्वरूपात केली जाऊ शकते.

PhonePe (Photo Credits: PhonePe)

शहरी भागामध्ये धनतेरस (Dhanteras) सणापासून दिवाळी (Diwali) सेलिब्रेशन सुरू होतं. दिव्यांचा, झगमगाटीचा हा सण आपल्याला धन धान्यांची देखील पूजा करण्याची शिकवण देतो. धनतेरस दिवशी अनेकजण सोनं खरेदी करतात. या दिवशी लक्ष्मी माता, कुबेराची पूजा केली जाते. भारतीयांची सोनं खरेदीची ही रीत पाहून आता 'PhonePe' कडून यंदा धनतेरसच्या दिवशी डिजिटली सोनं खरेदीसाठी Golden Days campaign लॉन्च करण्यात आले आहे.

फोन पे वरून सोनं, चांदी खरेदी करणार्‍यांसाठी धनतेरसच्या मुहूर्तावर खास कॅशबॅक ऑफर आजे/ फोन पे वर सोनं खरेदी करणार्‍यांना 2500 पर्यंत तर चांदी खरेदी करणार्‍यांना 500 रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. हे देखील नक्की वाचा: Dhanteras Muhurat Timing: धनतेरस दिवशी सोनं, चांदी सह मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसह लक्ष्मी मातेच्या पूजनाचा मुहूर्त पहा काय? 

फोन पे वर सोनं, चांदी खरेदी दरम्यान कॅश बॅकची ऑफर 26 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2022 दरम्यान लागू असणार आहे. यामध्ये सोनं खरेदी डिजिटल, कॉईन किंवा बार अशा कोणत्याही स्वरूपात केली जाऊ शकते. फोन पे कडून सोनं आणि चांदीचे बार, कॉईन हे घरपोच देखील दिले जाणार आहेत.

फोन पे वर कशी कराल सोनं, चांदी खरेदी?

सोनं हा सर्वात मौल्यवान धातू आहे. शुभ मुहूर्तावर, प्रसंगी त्याची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.