फोनच्या चार्जिंगची समस्या? आपल्या फोननुसार खरे आणि बनावट चार्जर ओळखण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

मात्र इतके पैसे खर्च करून घेतलेला चार्जर हा डुप्लिकेट आहे की नाही हे ओळखणे फारच कठीण काम आहे. म्हणूनच आम्ही सांगणार आहोत काही टिप्स ज्यामुळे तुमच्या फोन कंपनीनुसार एखादा चार्जर हा खरा आहे का नकली हे ओळखणे आपल्यासाठी शक्य होईल.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपण स्मार्टफोन विकत घेतो, त्यासोबत एक्सेसरीज म्हणून आपल्याला चार्जरही (Mobile Charger) दिला जातो. मात्र सध्याच्या एका सर्व्हेनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळणाऱ्या स्मार्टफोन चार्जरपैकी, बरेचसे चार्जर हे नकली (Duplicate Charger) असल्याचे दिसून आले आहे. अशा बनावट चार्जरमुळे फोन वारंवार गरम होणे. ब्लास्ट होणे, फोन लवकर चार्ज न होणे, चार्जिंग लवकर संपणे किंवा फोन खराब होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र इतके पैसे खर्च करून घेतलेला चार्जर हा डुप्लिकेट आहे की नाही हे ओळखणे फारच कठीण काम आहे. म्हणूनच आम्ही सांगणार आहोत काही टिप्स ज्यामुळे, तुमच्या फोन कंपनीनुसार एखादा चार्जर हा खरा आहे का नकली हे ओळखणे आपल्यासाठी शक्य होईल.

सॅमसंग (Samsung)

सॅमसंगच्या ओरिजनल आणि डुप्लिकेट चार्जरमधील फरक हा अतिशय बारीक असतो. चार्जरवर जे प्रिंटेड मॅटर आहे त्यावर 'A+' आणि 'मेड इन चाइना' लिहिले असेल तर समजावे ते चार्जर डुप्लिकेट आहे. तर ओरिजनल चार्जरच्या पिनचा बेस (पांढरा भाग) खाली जाड आणि वर बारीक असतो. डुप्लिकेट चार्जरमध्ये हाच भाग एकसमान असतो.

आयफोन (iPhone)

सॅमसंगप्रमाणेच आयफोनचा खरा अथवा खोटा चार्जर ओळखणे सोपे काम नाही. आयफोनच्या ओरिजनल चार्जरच्या अॅडॅप्टरवर प्रिंटेड मॅटर सेमी ट्रान्सपरंट असते, तर डुप्लिकेट चार्जरवर हे मॅटर डार्क काळ्या शाईने प्रिंट केलेले असते. हा एक मुलभूत फरक आहे. यासोबत  तसेच ज्या चार्जरवर ‘डिझाइन बाय कॅलिफोर्निया’ असे लिहिलेले  असते तो चार्जर ओरिजनल आहे असे समजावे.

एमआय (MI)

चायनीज कंपनी एमआयचे देखील डुप्लिकेट चार्जर मार्केटमध्ये विकले जातात. या फोनचा खरा चार्जर ओळखणे सोपे आहे. चार्जरची केबल जर 120 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल, अॅडॅप्टरचे कोपरे जर का शार्प नसतील आणि याचा आकारही सामान्य चार्जरपेक्षा मोठा असेल तर ते डुप्लिकेट चार्जर आहे हे समजावे. (हेही वाचा: लवकरच मोबाईलमधून गायब होतील हे महत्वाचे फिचर्स)

वन प्लस (OnePlus)

वन प्लस आपल्या डॅश चार्जरसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे काही मिनिटांमध्येच मोबाईल फुल चार्ज होतो. मात्र मोबाईल मॉडेलनुसार त्यांचे अॅडॅप्टर हे वेगवेगळे असू शकतात. वन प्लसचे ओरिजनल चार्जर ओळखायची पद्धत म्हणजे जेव्हा तुम्ही प्लग ऑन कराल तेव्हा स्क्रीनवर डॅश चार्जिंग लिहीलेले दिसेल, तेच जर चार्जर डुप्लिकेट असेल तर केवळ चार्जिंग लिहिलेले दिसेल. यासाठी फोन खरेदी केल्यावर तुम्हाला प्रथम तो चार्जिंगला लावून पाहणे गरजेचे आहे.

हुवेई (Huawei)

हुवेईचे खरे चार्जर ओळखणेही सोपे आहे. यासाठी अॅडॅप्टरवर असलेला बारकोड स्कॅन करा. बारकोडवर जी माहिती आहे ती बारकोडसोबत मिळती-जुळती नसेल तर तो चार्जर डुप्लिकेट आहे असे समजावे.

गुगल पिक्सल (Google Pixel)

इतर फोन्सप्रमाणे गुगलनेही आपल्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये फोन लवकर चार्ज होण्याची सुविधा दिली आहे. पण जर का चार्जर डुप्लिकेट असेल, तर फोन लवकर चार्ज होणार नाही. चार्जरच्या पिनवरुनदेखील तुम्ही डुप्लिकेट आणि ओरिजनल चार्जरची ओळख पटवू शकता. गुगल पिक्सलच्या डुप्लिकेट चार्जरची पिन ही लांब असते, तर ओऱिजनल चार्जरची छोटी.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now