Paytm Android App Temporarily Unavailable on Google Play Store: पेटीएम नव्याने डाऊनलोड, अपडेट साठी बंद, पैसे सुरक्षित: पेटीएम ची ट्वीट करत युजर्सना माहिती

पेटीएमने ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये पेटीएम अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप (Paytm Android app) तात्पुरते गूगल प्ले स्टोअर वरून नव्या डाऊनलोड्स आणि अपडेट साठी उपलब्ध नसेल अशी माहिती देण्यात आली आहे.

Paytm (Photo Credits: IANS)

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भारतामध्ये डिजिटल व्यवहारांना गती मिळाली. अनेकांनी त्यानंतर लहान मोठ्या कामांसाठी पेटीएम (Paytm Android App) सारखे ऑनलाईन अ‍ॅप डिजिटल व्यवहारांसाठी वापरण्याला पसंती दर्शवली मात्र आज (18 सप्टेंबर) गॅमलिंग पॉलिसीच्या (Gambling Policies) नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Playstore) पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Games) हटवण्यात आले आहे. यानंतर सामान्य युजर्समध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावर काही वेळापूर्वीच पेटीएम कडून स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले आहे. पेटीएम युजर्सचे पैसे सुरक्षित असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Paytm and Paytm First Games Pulled down from Google Playstore: पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवले; गैंबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी केली कारवाई.

 

पेटीएमने ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये पेटीएम अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप (Paytm Android app) तात्पुरते गूगल प्ले स्टोअर वरून नव्या डाऊनलोड्स आणि अपडेट साठी उपलब्ध नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र कंपनीला आशा आहे की लवकरच हे अ‍ॅप उपलब्ध होईल. दरम्यान ज्यांनी यापूर्वीच अ‍ॅप डाऊनलोड केले असेल, त्यामध्ये वॉलेटमध्ये पैसे असतील तर ते सुरक्षित आहेत. तुम्ही ते आधीप्रमाणेच अगदी सामान्यपणे वापरू शकता. असे देखील पेटीएमकडून सांगण्यात आले आहे.

पेटीएम ट्वीट

Paytm ची मालकी भारतीय कंपनी One97 Communications Ltd कडे आहे. त्याची स्थापना विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma)यांनी केली आहे. मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग हे fintech firm Ant Financials कडून येते, जी कंपनी चीनच्या अलिबाबा ग्रुपचा भाग आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement