PayPal भारतामध्ये 1 एप्रिल 2021 पासून Domestic Payment Services बंद करणार

भारतामध्ये ऑनलाईन फिल्म बुकिंग अ‍ॅप बूक माय शो, फूड डिलेव्हरी अ‍ॅप स्विगी,ट्रॅव्हल आणि तिकिटिंग सर्व्हिस मेक माय ट्रीप यावर युजर्सना पे पाल चा पर्याय ऑनलाईन पेमेंटसाठी दिला जात आहे. मात्र 1 एप्रिलपासून आता तो बंद केला जाणार आहे.

PayPal (Photo Credits: Pixabay)

PayPal Holdings Inc या ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसने यंदा 1 एप्रिल पासून भारतामध्ये डोमेस्टिक व्यवहार बंद करत असल्याची माहिती आज दिली आहे. भारतामध्ये आता 1 एप्रिल 2021 पासून स्थानिक व्यवहार पे पालच्या (PayPal) माध्यमातून करता येणार नाही असे स्पष्ट करणारे एक पत्रक कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधील सेन जोसे मध्ये पे पाल चं कार्यालय आहे. पे पालने दिलेल्या माहितीनुसार आता त्यांना डोमेस्टिक व्यवहारांपेक्षा क्रॉस बॉर्डर पेमेंट बिझनेस वर अधिक लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच 1 एप्रिल पासून ग्लोबल कस्टमर्सना भारतीय मर्चंट्सना या सेवेचा लाभ वापर करून ऑनलाईन व्यवहार करता येणार आहे.

दरम्यान भारतामध्ये ऑनलाईन फिल्म बुकिंग अ‍ॅप बूक माय शो, फूड डिलेव्हरी अ‍ॅप स्विगी,ट्रॅव्हल आणि तिकिटिंग सर्व्हिस मेक माय ट्रीप यावर युजर्सना पे पाल चा पर्याय ऑनलाईन पेमेंटसाठी दिला जात आहे. मात्र 1 एप्रिलपासून आता तो बंद केला जाणार आहे. पण तुम्ही परदेशी व्यवहारांसाठी जर पे पाल वापरत असाल तर तुम्हांला भविष्यात पे पाल वापरता येणार आहे. आता WhatsApp च्या माध्यमातून Transfer करू शकाल पैसे; NPCI ने दिली परवानगी.

 

भारतामध्ये पे पालची बेंगलूरू, चैन्नई आणि हैदराबाद मध्ये कार्यालयं आहेत. येथे पे पालची आता डिजिटल व्यवहारांमध्ये काम करणारी टीम remittances business वर लक्ष केंद्रीत करणार आहे.  भारतामध्ये सध्या युपीआय सेवा देण्यामध्ये गूगल, व्हॉट्सअ‍ॅप, अमेझॉन, फेसबूक, वॉलमार्ट यांच्यामध्ये तगडी स्पर्धा सध्या सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement