जंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स

त्यामुळे वजन वाढण्यासोबतच अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.

Amazon sells Pavlok bracelet (Photo Credits: Amazon)

आजकाल तरुणाईला फास्ट फूड, जंक फूडची एक वाईटच म्हणायला हवी अशी सवय जडली आहे. त्यामुळे वजन वाढण्यासोबतच अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. अनेकदा या जंक फूडचे दुष्परिणाम ठाऊक असूनही त्याचा मोह टाळणं कठीण होतं. जंक फूड खाण्याची सवय सुटावी म्हणून आपण विविध युक्त्या करतो. पण अनेकदा त्याचा काही उपयोग होत नाही. मात्र तुमच्या आमच्या या वाईट सवयीवर एक मस्त पर्याय बाजारात उपलब्ध आहे.

Pavlok Bracelet असं या पर्यायाचं नाव आहे. हे ब्रेसलेट घातल्याने तुम्ही जेव्हा कधी जंक फूड खाल तेव्हा तुम्हाला करंट लागेल. इतकंच नाही तर तुमच्या इतर वाईट सवयी सोडवण्यासाठी देखील हे अत्यंत परिणामकारक आहे. उदा. ऑनलाईन वेळ घालवणे, नखे खाणे, स्मोकिंग करणे, जास्त जेवणे, झोपणे, फास्ट फूड खाणे, इत्यादी. या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर या ब्रेसलेट म्हणून तुम्हाला करन्ट बसेल आणि तुम्हाला सतर्क केलं जाईल.

या Pavlok Bracelet ची किंमतही अगदी जबरदस्त आहे. अ‍ॅमेझॉनवर या ब्रेसलेटची किंमत 199 डॉलर म्हणजे 13 हजार 893 इतकी आहे.