YouTube द्वारे महिन्याला 7 लाख रुपयांपेक्षा अधिक कमावण्याची संधी; जाणून घ्या डिटेल्स
शॉर्ट्स फंड सुरू केल्यामुळे, क्रिएटर्स आणि कलाकारांना आता यू-ट्यूब वर दरमहा मोठी कमाई करण्याची संधी मिळेल. यूट्यूबचे मुख्य व्यवसाय अधिकारी रॉबर्ट किंकल म्हणाले की, क्रिएटर्सच्या कमाईच्या मुळाशी जाहिराती असतात
जर तुम्ही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असाल तर यूट्यूब (YouTube) तुम्हाला अधिक पैसे कमवण्याची संधी देत आहे. इन्स्टाग्राम रील आणि टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी यूट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) लाँच करण्यात आले. यूट्यूब हे चीनी व्हिडिओ अॅप टिकटॉकच्या धर्तीवर स्वतःचे स्वतंत्र शॉर्ट्स अॅप लाँच करत आहे. यूट्यूब भारतासह अनेक देशांमध्ये शॉर्ट्स अॅपसाठी 10 कोटी डॉलरचा मोठा निधी जारी करत आहे. यासह, 2021-22 या आर्थिक वर्षात, यूट्यूब क्रिएटर्स शॉटर्सद्वारे दरमहा 7,400 रुपये (100 डॉलर) पासून ते 7,40,000 रुपये (10,000 डॉलर) पर्यंत कमाई करू शकतात.
हे पेमेंट शॉट्सचे व्ह्यूज आणि एंगेजमेंटच्या आधारे केले जाईल. हा निधी जुलै 2021 दरम्यान निवडक देशांमध्ये उपलब्ध होईल. यामध्ये भारत, ब्राझील, जपान, रशिया, यूके, यूएसए, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, इंडोनेशिया आणि मेक्सिको यांचा समावेश आहे. यूट्यूबने म्हटले आहे की, दरमहा या 10 कोटी डॉलर्सच्या फंडमधून पेमेंटचा दावा करण्यासाठी ते हजारो क्रिएटर्सशी संपर्क साधतील. हा निधी यू-ट्यूबवर शॉर्ट्ससाठी कमाईचे मॉडेल तयार करण्यात मदत करेल.
(हेही वाचा: Amazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं?)
यामध्ये कोणताही क्रिएटर भाग घेऊ शकतो. शॉर्ट्स फंड सुरू केल्यामुळे, क्रिएटर्स आणि कलाकारांना आता यू-ट्यूब वर दरमहा मोठी कमाई करण्याची संधी मिळेल. यूट्यूबचे मुख्य व्यवसाय अधिकारी रॉबर्ट किंकल म्हणाले की, क्रिएटर्सच्या कमाईच्या मुळाशी जाहिराती असतात. यूट्यूब प्रीमियम हा एक सशुल्क सबस्क्रिप्शन पर्याय आहे जो सदस्यांना जाहिरातमुक्त कंटेंट, बॅकग्राउंड प्लेबॅक, डाउनलोड आणि यूट्यूब म्युझिक अॅपचा प्रीमियम अॅक्सेस देतो. कंपनीने म्हटले आहे की, सबस्क्रिप्शनचा बहुतांश महसूल युट्युब पार्टनर्सना जातो.