लॉन्चिंगच्या अगोदर Oppo A74 5G स्मार्टफोनची किंमत लीक; मिड-बजेटमध्ये मिळतील 'हे' खास फिचर्स

लीक झालेल्या वृत्तानुसार, Oppo A74 5G स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आलेल्या OPPO A93 5G ची पुनर्विकृत आवृत्ती असेल.

Oppo A74 5G smartphone (PC - www.oppo.com)

ओप्पोचा नवीन स्मार्टफोन Oppo A74 5G 20 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनशी संबंधित अनेक अहवाल समोर आले आहेत. ज्याl त्याच्या संभाव्य फिचर्संविषयी माहिती देण्यात आली आहे. आता कंपनीचे उपाध्यक्ष तस्लीम आरिफ यांनी Oppo A74 5G ची किंमत उघड केली आहे.

Oppo A74 5G किंमत -

गिज्मोचायनाच्या अहवालानुसार, ओप्पोचे उपाध्यक्ष तस्लीम आरिफ यांनी ट्विट केले की, भारतात Oppo A74 5G ची किंमत 20,000 रुपयांच्या खाली ठेवली जाईल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल. याशिवाय फारशी माहिती मिळाली नाही. (वाचा - LG Wing स्मार्टफोन तब्बल 40 हजार रुपयांनी स्वत, मर्यादित कालावधीसाठी कंपनीने उपलब्ध केला स्टॉक)

Oppo A74 5G ची स्पेसिफिकेशन -

लीक झालेल्या वृत्तानुसार, Oppo A74 5G स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आलेल्या OPPO A93 5G ची पुनर्विकृत आवृत्ती असेल. Oppo A74 5G स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एफएचडी प्लस एलसीडी डिस्प्ले असेल, ज्याचा रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल असेल. तसेच, वापरकर्त्यांना डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात प्रथम 48 एमपी वाइड एंगल लेन्स, द्वितीय 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि तिसरा 2 एमपी खोलीचा सेन्सर असेल. तर त्याच्या समोर 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. Oppo A74 5G मध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना आगामी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, कंपनीने जानेवारी 2021 मध्ये Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन भारतात सादर केला होता. या स्मार्टफोनची किंमत 35,990 रुपये आहे. Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर, 8 जीबीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना 4,350mAh बॅटरी 65W सुपरव्हीओसी 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 4 जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा एफएचडी + ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1,080 x 2,400 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रथम 64 एमपी प्राइमरी सेन्सर, दुसरा 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि चौथा 2 एमपी मोनो पोर्ट्रेट लेन्स आहे. डिव्हाइसच्या पुढील बाजूस 32 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे.