Twitter Blue Subscribers Features: फक्त ट्विटर ब्लू सब्सक्राइबर्संना मिळतात 'हे' 4 खास फीचर्स; फ्री यूजर्संना मिळणार नाही सेवा
15 एप्रिलपासून, ब्लू सदस्यचं केवळ पोल तयार करू शकतात. ब्लू टिक नसलेले सदस्य पोल तयार करू शकणार नाहीत.
Twitter Blue Subscribers Features: एलोन मस्क (Elon Musk) यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर 44 डॉलर अब्जांना विकत घेतले आणि तेव्हापासून ते कंपनीच्या कार्यपद्धतीत बरेच बदल करत आहेत. ट्विटर ब्लूचे (Twitter Blue) सदस्यत्व घेतलेल्या वापरकर्त्यांसाठी मस्कने अनेक मोठे बदल केले आहेत. शल मीडिया कंपनीने अनेक देशांमध्ये ब्लू सबस्क्रिप्शनचा विस्तार केला आहे. इलॉन मस्क लोकांना थेट आणि अप्रत्यक्षपणे ट्विटरचे ब्लू सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी दबाव आणत आहे. ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी आता विनामूल्य वापरकर्त्याची काही वैशिष्ट्ये काढून टाकली आहेत आणि त्यांना ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट केले आहे.
हे फीचर्स वापरण्यासाठी यूजरला ट्विटरचे ब्लू सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. आम्ही तुम्हाला अशा 4 फिचर्स सांगणार आहोत जे आधी फ्री होते पण आता ते फक्त सब्स्क्रिप्शन युजर्ससाठी उपलब्ध आहेत. ट्विटरने अलीकडेच जाहीर केले की ते लवकरच विनामूल्य वापरकर्त्यांसाठी एसएमएस-आधारित टू-फैक्टर ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यास समर्थन देणे थांबवेल. 20 मार्चपासून ब्लूचे सदस्यत्व घेतलेले ट्विटर वापरकर्ते टू-फैक्टर ऑथेंटिकेशन वैशिष्ट्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. (हेही वाचा - Amitabh Bachchan On Elon Musk: ट्विटर 'ब्लू टिक' परत मिळताच अमिताभ बच्चन यांनी मानले एलन मस्क आभार; म्हणाले 'Tu cheez badi hai Musk Musk')
टू स्टेप ऑथेंटिकेशन ही एक सुरक्षा प्रक्रिया आहे, जी तुमच्या खात्याला अतिरिक्त गोपनीयता देते. टू फॅक्टर ऑथेंटिकेशनला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, टू स्टेप व्हेरिफिकेशन, 2FA किंवा ड्युअल फॅक्टर ऑथेंटिकेशन असेही म्हणतात.
ट्विटर पोलसाठी सबस्क्रिप्शन आवश्यक -
ट्विटर पोल फीचरमध्ये काही बदल करत आहे. 15 एप्रिलपासून, ब्लू सदस्यचं केवळ पोल तयार करू शकतात. ब्लू टिक नललेले सदस्य पोल तयार करू शकणार नाहीत. किंवा त्यावर मतदान करू शकणार नाहीत. म्हणजेच आता हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी जाहीर केले होते की, ट्विटरने Recommendations बाबत मोठा बदल केला आहे. 15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित वापरकर्ते तुमच्यासाठी शिफारसी फीड पाहण्यास सक्षम असतील. या महिन्याच्या सुरुवातीला, मस्कने सांगितले की, ट्विटर तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांच्या प्रत्युत्तरांना प्राधान्य देईल. यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉट्ससमोर येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, असे मस्क यांनी म्हटले होते.