OnePlus Nord SE स्मार्टफोन पुढील वर्षात ग्लोबल बाजारात होणार लॉन्च, रिपोर्टमध्ये खुलासा

OnePlus Nord Smartphone Launched In India (Photo Credits: OnePlus India)

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने त्यांच्या लेटेस्ट Nord सीरिज अंतर्गत नवा हँडसेट OnePlus Nord Se वर काम करत आहे. या आगामी फोन बद्दल काही रिपोर्ट्स सुद्धा लीक झाले आहेत. अशातच एका रिपोर्टनुसार, वनप्लस नॉर्ड एसई या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग आणि स्पेसिफिकेशन बद्दल माहिती मिळाली आहे. तर Android Centreal च्या रिपोर्टनुसार, OnePlus Nord SE स्मार्टफोन मार्च 2021 मध्ये ग्लोबली लॉन्च केला जाणार आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास OnePlus Nord SE स्मार्टफोन Warp Charge 65 फास्ट चार्जिंग आणि 4500mAh च्या बॅटरीसह येणार आहे. त्याचसोबत फोनमध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला आगामी डिवाइसमध्ये Snapdragon 765G प्रोसेसरवर काम करणार आहे.

OnePlus Nord SE च्या किंमती बद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र बजेट रेंजमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कंपनीकडून आतापर्यंत OnePlus Nord SE च्या लॉन्चिंग, किंमत आणि फिचर बद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.(Micromax In 1b ची प्री-बुकिंग आजपासून सुरु, 24 डिसेंबरला होणार पहिला सेल, जाणून याची खास वैशिष्ट्ये)

तर गेल्या महिन्यात कंपनीने ऑक्टोंबर महिन्यात OnePluse Nord N10 5G आणि Nord N1 लॉन्च केला होता. वनप्लस नॉर्ड एन10 5जी च्या 64GB रॅम+128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 329 GBP (32,000 रुपये) आणि वनप्लस Nord N100 च्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 179 GBP (17,300 रुपये) ठेवण्यात आली आहे.

OnePlus Nord N10 5G स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. हा अॅन्ड्रॉइडवर आधारित OxygenOS 10.5 वर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.49 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याचसोबत फोनमध्ये Qualcomm Snapdragon 690 5G प्रोसेसर, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिला आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये 64MP क्वाड कॅमेरा सेटअप सपोर्ट दिला आहे. या फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.(नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार? तर 12 हजारांहून कमी किंमती मधील 'या' दमदार फोनबद्दल जरुर जाणून घ्या)

OnePlus Nord N100 मध्ये 4जी कनेक्टिव्हिटी दिली आहे. हा अॅन्ड्रॉइड वर आधारित OxygenOS 10.5 वर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून त्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याचसोबत फोनध्ये Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर, 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज दिला आहे. तसेच डिवाइसमध्ये 13MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सपोर्ट मिळणार आहे. या फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now