OnePlus Band ची आज भारतीय बाजारात झाली एन्ट्री, काय आहे यात विशेष?
वनप्लस कंपनीचा हा पहिला वियरेबल डिवाईस आहे. त्यामुळे या स्मार्टबँड बाजारातील रेडमी, Realme बँड ला जबरदस्त टक्कर देणार आहे. नुकताच या बँडचा लाँचिंग इव्हेंट झाला.
स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus अल्पावधीत भारतीय ग्राहकांना वेडं लावले. त्याचे जबरदस्त फिचर्स असलेल्या स्मार्टफोन्सनी ग्राहकांवर जणू भुरळच पाडली. आता एक पाऊल पुढे टाकत OnePlus कंपनी आपला स्मार्टबँड (Smart Band) भारतीय बाजारात आणला आहे. OnePlus Band असे याचे नाव असून यात फिटनेससंबंधी(Fitness Band) जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे. वनप्लस कंपनीचा हा पहिला वियरेबल डिवाईस आहे. त्यामुळे या स्मार्टबँड बाजारातील रेडमी, Realme बँड ला जबरदस्त टक्कर देणार आहे. नुकताच या बँडचा लाँचिंग इव्हेंट झाला.
OnePlus Band च्या डिस्प्ले विषयी सांगायचे झाले तर, यात 1.1 इंचाची AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आली आहे. तसेच याती UI वॉलपेपरमुळे ग्राहक हे कस्टमाइदज सुद्धा करु शकतात. या बॅटरी खासियत म्हणजे यात 100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 14 दिवस कार्यरत राहील. हा बँड USB-A वायर चार्जरच्या मदतीने चार्ज केला जातो.हेदेखील वाचा- OnePlus Nord N10 5G आणि Nord100 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
वनप्लस बँड Android 6.0 पेक्षा वर असलेल्या सर्व डिवाईसशी सुद्धा कनेक्ट होतो. एकदा हा डिवाईसशी कनेक्ट झाला की, तुम्हाला OnePlus Health अॅपच्या मदतीने आपण हेल्थ डेटा ट्रॅक करु शकता. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटुथ 5.0 LE देण्यात आला आहे. त्याचबरोबर या बँडद्वारे तुम्ही हार्ट रेट सेंसर, SpO2 ट्रॅकर, स्लीप मॉनिटर, जायरोस्कोप आणि 3-एक्सेस एक्सेलेरोमीटर सेंसर दिले आहेत. यात इंडोर आणि आऊटडोर फीचर्ससुद्धा दिले आहेत. त्याचबरोबर यात तुम्ही योगा, व्यायाम, स्विमिंग, क्रिकेट सारख्या अॅक्टिव्हिटीसुद्धा ट्रॅक करु शकता.
OnePlus Band ची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. या बँडचा सेल 12 जानेवारीपासून सुरु होईल. इच्छुक ग्राहकांना हा बँड Amazon India आणि OnePlus India च्या ऑनलाई स्टोर वर आणि फ्लिपकार्टवरही उपलब्ध होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)