OnePlus 8, OnePlus 8 Pro होणार आज लॉन्च; काय आहेत फोनचे स्पेसिफिकेशन्स? कॅमेरा, बॅटरीलाईफ आणि प्राईज!
भारतासह संपूर्ण जगभरात वन प्लस (OnePlus) कंपनीचा नवे स्मार्टफोन आज लॉंच होणार आहे. कंपनीने गेल्या काही दिवसापूर्वी वन प्लस 8 (OnePlus 8) आणि वन प्लस 8 प्रो (OnePlus 8 Pro) या 2 स्मार्टफोनची लॉंचिंग करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे सर्व स्मार्टफोन चाहत्यासांठी उत्सुकता लागली होती.
भारतासह संपूर्ण जगभरात वन प्लस (OnePlus) कंपनीचा नवे स्मार्टफोन आज लॉंच होणार आहे. कंपनीने गेल्या काही दिवसापूर्वी वन प्लस 8 (OnePlus 8) आणि वन प्लस 8 प्रो (OnePlus 8 Pro) या 2 स्मार्टफोनची लॉंचिंग करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे सर्व स्मार्टफोन चाहत्यासांठी उत्सुकता लागली होती. आज वन प्लस कंपनी लाईव्ह स्टिमिंगच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही स्मार्टफोनचे लॉंचिंग करणार आहेत. वन प्लस कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन रिसर्च करून बनवण्यात आला आहे, असा खुलासा केला होता. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर प्रसिद्धी मिळवेल असा, विश्वासही कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. सध्या या दोन्ही स्मार्टफोनमधील फिचरची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. तर जाणून घेऊन वन प्लसच्या नव्या स्मार्टफोनची फिचर्स आणि किंमत
कंपनीचे सीईओ Pete Lau ने आपल्या मुलाखातीत सांगितले होते की, वन प्लस कंपनीचे बाजारात येणारे महागडे असणार आहेत. तसेच हा स्मार्टफोन ग्लेशियर ग्रीन कलर मध्ये बाजारात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, युरोप मध्ये वन प्लस 8 प्रो ( 8जीबी रॅम+ 128 जीबी ) किंमत 76 हजारांच्या जवळपास आहे. तर , 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 85 हजार रुपयांच्या जवळपास आहे. हे देखील वाचा- Tata Sky च्या 10 सर्विसेस लॉकडाउनच्या काळात फ्री, App वर पाहता येणार स्वस्त पॅक
वन प्लस 8 प्रो मध्ये 6. 78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, वन प्लस 8 मध्ये 6.55 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच वन प्लस 8 प्रो मध्ये 4 हजार 510 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर वन प्लस 8 मध्ये 4 हजार 300 एमएएच बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2020 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

