आता गरीब, कुरूप, बेढब, दिव्यांग लोकांना Tik Tok वर थारा नाही; कंपनी लवकरच काढून टाकणार अशा युजर्सचे व्हिडिओ
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिक टॉक (TikTok) चीनसह हगातील इतर अनेक देशांत लोकप्रिय आहे. भारतातही टिक टॉकचे हजारो वापरकर्ते आहेत
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिक टॉक (TikTok) चीनसह हगातील इतर अनेक देशांत लोकप्रिय आहे. भारतातही टिक टॉकचे हजारो वापरकर्ते आहेत. टिक टॉक लवकरच आपल्या व्हिडिओ कंटेंटमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. टिक टॉक लवकरच कुरूप, गरीब आणि दिव्यांग असणार्या वापरकर्त्यांचे व्हिडिओ फिल्टर करणार आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रीमियम वापरकर्त्यांमध्ये आपली प्रतिमा सुधारण्यासाठी टिक टॉक असे काही बदल करणार आहे. द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, द इंटरसेप्टला एक अहवाल मिळाला आहे, ज्यामध्ये कंपनीच्या धोरणात होत असलेल्या बदलांचा उल्लेख आहे.
या अहवालात, टिक टॉकने आपल्या नियंत्रकांना कुरूप, गरीब आणि दिव्यांग वापर्कार्त्यांचे व्हिडिओ हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेव्हा जेव्हा वापरकर्ते त्यांच्या टाइमलाइनवर जातील तेव्हा त्यांनी असाच कंटेंट दिसेल जो त्यांच्यासाठी बनला आहे अशी त्यांना जाणीव होईल. याअंतर्गत निरुपयोगी कंटेंट फिल्टर करण्याचेही निर्देश आहेत. टिक टॉक ज्या प्रकारचा कंटेंट हातावाण्य्च्या तयारीत आहे, त्यावर मुख्यत्वे थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधून व्हूज मिळत आहेत.
हे व्हिडिओ फिल्टर करण्यासाठी टिक टॉकच्या मॉडरेटर्सना अनेक श्रेण्या सुचविल्या गेल्या आहेत. त्यामध्ये शरीराचा असामान्य आकार - खूप जाड किंवा खूप बारीक, या व्यतिरिक्त, जे लोक अतिशय कुरुप दिसतात किंवा दिव्यांग लोक अशांचा समावेश आहे. ज्यांचे पोशाख चांगले नाहीत किंवा जे गरीब दिसतात अशा लोकांवरही बंदी घालण्यास सांगितले आहे. कंपनीला असा विश्वास आहे की, वाईट लूकचे व्हिडिओही वाईटच दिसतात आणि नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यास ते यशस्वी ठरत नाहीत. या अहवालानुसार, ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित करण्यात येतात त्या जागाही महत्वाच्या असणार आहेत. ही जागा घाणेरडी किंवा वाईट दिसत असली तरीही हा व्हिडिओ टाइमलाइनवरून काढला जाईल. (हेही वाचा: बुलढाणा: Tik Tok चा व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क 200 फूट उंच पूलावरुन पुर आलेल्या नदीत उडी)
यावर, गार्डियनला दिलेल्या स्पष्टीकरणात टिक टॉकच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीचे उद्दीष्ट केवळ समाजासाठी हानिकारक असणारा वाईट कंटेंट काढून टाकणे हा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2020 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

