No Moonlighting: 'डबल नोकरी' करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इन्फोसिस कंपनीचा इशारा, 'नो मूनलाइटिंग'
कंपनीने कर्मचाऱ्यांना 12 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, जर ते मूनलाइटींग (Moonlighting) करत असतील तर त्यांची कंपनीतून हाकालपट्टी केली जाईल.
माहिती तंत्रज्ञान अर्थातच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Information Technology) क्षेत्रातील अग्रगण्य इन्फोसिस (Infosys) कंपनीने एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी (Double Job) अथवा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना 12 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, जर ते मूनलाइटींग (Moonlighting) करत असतील तर त्यांची कंपनीतून हाकालपट्टी केली जाईल. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मेलमध्ये विप्रो कंपनीचे चेअरमन रिषद प्रेमजी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यांनी या प्रकाराला धोकेबाजी म्हणून संबोधित केले होते. इन्फोसिसच्या मनुष्यबळ विभागाने (HR) ने कर्मचाऱ्यांना जो ई-मेल पाठवला आहे त्यात म्हटले आहे की, 'लक्षात ठेवा टू टाइमिंग नाही-मूनलाइटिंग नाही'. कंपनीच्या या ई-मेलनंतर सर्वसामान नागरिकांना प्रश्न पडला आहे की हे मूनलाइटींग प्रकरण काय आहे? मग घ्या जाणून.
मूनलाइटिंग म्हणजे काय?
मूनलाइटींग याचा अर्थ असा की, एकाच वेळी दोन किंवा अधिक ठिकाणी नोकरी. मेलमध्ये म्हटले आहे की, कंपनीने एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे जर कोणी इन्फोसिसमध्ये काम करते आहे आणि त्याच वेळी इतरही कोणत्या ठिकाणी काम करत असेल तर त्या प्रकाराला मूनलाइटिंग या परिभाषेत गणले जाईल. म्हणजेच कंपनीच्या कामाचे तास किंवा त्या व्यक्तीरिक्तही कोणी इतर कंपनीसाठी काम करत असेल तर तो प्रकार मूनलाइटिंग आहे. (हेही वाचा, IT Jobs: आयटी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, कोरोना काळातही 'या' कंपनीला हवे आहेत नवीन 55,000 हून अधिक फ्रेशर्स)
जुलै महिन्यात कोटक इन्स्टीट्यूशनल इक्विटीजने जवळपास 400 आयटी/आयटी इनबेल्ड सर्विसेजवर सर्वे केला होता. ज्यात जवळपास 65 कर्मचारी वर्क फ्रॉम होम दरम्यान अनेक ठिकाणी पार्ट टाईम काम करत होते. कर्मचाऱ्यांच्या या प्रकाराबाबत त्यांच्या सहकर्मचाऱ्यांना पूर्ण कल्पना असते, असेही आढळून आले आहे.
दरम्यान, इन्फोसिसच्या एप्लॉयी हँडबूक आणि कोड ऑफ कंडक्ट अन्वये एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी करण्यास मान्यता देण्यात आली नाही. ऑफल लेटरनुसार कंपनीला विचारल्याशिवाय किंवा त्याबाबत अधिकृत मान्यता घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला पूर्णवेळ अथवा अर्धवेळ इतर ठिकाणी काम करता येणार नाही.असे केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकले जाईल.