NetFlix ने भारतात लाँच केला 199 रुपयांचा 'Mobile Only' प्लान

त्यामुळे नेटफ्लिक्स भारतामध्येही खूप चलती आहे. त्यामुळे येथील यूजर्सना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून नेटफ्लिक्स आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त असा 199 रुपयांचा प्लान लाँच केला आहे.

Netflix (File Image)

मनोरंजनाची अफलातून सर्विस देणारा नेटफ्लिक्स (NetFlix) हा भारतातील अग्रगण्य आणि लोकप्रिय  अॅप आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स भारतामध्येही खूप चलती आहे. त्यामुळे येथील यूजर्सना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून नेटफ्लिक्स आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त असा 199 रुपयांचा प्लान लाँच केला आहे. हा प्लान खास मोबाईल यूजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे.  यूजर्सना खूश करणे आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिद्वंदींना कडक टक्कर देणे हा यामागचा उद्देश आहे. या प्लाननुसार आता नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनसाठी तुम्हाला दरमहा 199 रुपये मोजावे लागणार आहे.

या प्लानच्या मदतीने यूजर्स एकाच वेळी स्मार्टफोन आणि टॅबलेटवर स्टँडर्ड डेफिशनेशन (SD)मध्ये पाहू शकाल. नेटफ्लिक्स चा हा भारतातील चौथा प्लान आहे. याआधी नेटफ्लिक्स चे तीन प्लान बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम आले आहेत. ज्यांची किंमत 499 रुपये ते 799 रुपयांच्या दरम्यान आहे.

हेही वाचा- Netflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या

जूनच्या शेवटी नेटफ्लिक्स 20 लाखांच्या वर नवीन सब्सस्क्राइबर्स जोडले गेले. तसेच नेटफ्लिक्स च्या सब्सस्क्राइबर्सची संख्या ही इतर देशांपेक्षा भारतामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणूनच त्यांनी भारतासाठी हा सर्वात स्वस्त प्लान आणल्याचे नेटफ्लिक्सचे संचालक अजय अरोरा यांनी सांगितले.

भारतातील यूजर्स  मोबाईलवर एखादा खास शो, वेबसिरीज पाहणे खूप पसंत करतात. त्यामुळे हा प्लान अशा मोबाईल यूजर्ससाठी खूपच फायदेशीर ठरेल, असेही ते म्हणाले. नेटफ्लिक्सच्या या नवीन 'Mobile Only' प्लान चे मार्च 2019 मध्ये काही देशांमध्ये सब्सक्रिप्शन सर्विस परीक्षण सुरु केले होते.