NASA ने घेतला चांद्रयान 2 च्या लॅन्डिंग साइटचा फोटो, लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता
मात्र आता विक्रम लॅन्डरसोबत संपर्क साधण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या मोहिमेतील विक्रम लॅन्डर (Vikram Lander) सोबत इस्रोकडून (ISRO) संपर्क साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. मात्र आता विक्रम लॅन्डरसोबत संपर्क साधण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र याच पार्श्वभुमीवर नासाच्या (NASA) मून ऑर्बिटरने चंद्राच्या ज्या क्षेत्राचा फोटो टिपला आहे जेथून चांद्रयान 2 सोबतचा संपर्क तुटला आहे.
नासाच्या एका वैज्ञानिकाच्या हवाल्याच्या एका रिपोर्टनुसार असे सांगितले आहे की, नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरच्या मदतीने 17 सप्टेंबरला काही फोटो घेतले आहेत. नासाने अद्याप या फोटोंचे अधिक विश्लेषण केले नसून त्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या क्षेत्रात चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत विक्रम लॅन्डरने 'सॉफ्ट लॅन्डिंग' करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विक्रम लॅन्डरचे 'हार्ड लॅन्डिंग' झाल्याने चंद्राच्या पृष्ठभागापासून दोन किमी अंतरावर असताना संपर्क तुटला होता.(Chandrayaan 2: शेवटचे दोनच दिवस इस्त्रोच्या हाती अन्यथा चांद्रयान-2 मोहीम संपुष्टात?)
विक्रम लॅन्डर सोबत संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे आता 21 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी आहे. त्यानंतर चंद्रावर मोठी रात्र होणार आहे. लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरचे डिप्युटी प्रोजेक्ट वैज्ञानिक जॉन केलर यांनी असे सांगितले आहे की, ऑर्बिटरच्या माध्यमातूनच फोटो घेण्यात आले असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्याचसोबत LRO ची टीम नव्याने टिपलेले फोटो आणि जुने फोटो यांच्यासोबत तुलना करुन अधिक विश्लेषण करणार आहेत. त्याचसोबत त्या फोटोत लॅन्डर दिसत आहे की नाही हे सुद्धा पाहणार आहेत. तर ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या येथून जात असताना काही फोटो घेण्यात आले आहेत. त्यावेळ पासूनच काळोख होण्यास सुरुवात झाली होती असल्याचे ही सांगण्यात आले आहे.