Motorola Razr 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, 1 लाखाच्या वर किंमत असलेल्या या फोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये
हा फोन पॉलिश्ड ग्रॅफाइट रंगात लाँच केला आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवर प्री बुक करु शकता. 12 ऑक्टोबरपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनवर HDFC Bank कार्ड होल्डर्संना 10,000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळेल.
मोटोरोलाचा (Motorola) बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Motorola Razr 5G अखेर भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत ऐकूनच अनेकांचे डोळे भिरभरले. मात्र साहजिकच जर त्याची किंमत तेवढी जास्त असेल तर त्याचे वैशिष्ट्येही तितकीच खास आणि हटके असणार. मोटोरोलाचा हा Clamshell फोल्डेबल डिस्प्ले (Foldable Display) असलेला स्मार्टफोन आहे. एप्रिल मध्ये लाँच झालेल्या Motorola Razr मध्ये काही नवीनतम बदल करुन हा Razr 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात आला आहे. या फोनची मोठी बॅटरी, 5G सपोर्ट आणि रिपोजिशन्ड फिंगरप्रिंट स्कॅनर युएसपी आहे.
या स्मार्टफोनची किंमत 1,24,999 रुपये इतकी आहे. हा फोन पॉलिश्ड ग्रॅफाइट रंगात लाँच केला आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवर प्री बुक करु शकता. 12 ऑक्टोबरपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनवर HDFC Bank कार्ड होल्डर्संना 10,000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळेल. मोटोरोला कंपनीचा Motorola E7 Plus स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लाँच, कुठे खरेदी करु शकाल?
लाखांच्या घरात असलेल्या या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात
6.2 इंचाची pOLED डिस्प्ले दिली आहे. तर 2.7 इंचाची सेकेंडरी डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेटसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB चे स्टोरेज दिले आहे.
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशनसह येतो. यात सेल्फीसाठी 20MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यात Li Po ची 2800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 15W फास्ट चार्ज सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.0, NFC, USB Type-C सपोर्ट, आणि ड्यूल-SIM सपोर्ट दिला गेला आहे.