Most Commonly-Used Passwords: युजर्स ठेवत आहेत इतके सोपे पासवर्डस; 30 देशांमध्ये ‘Samsung’ शब्दाला पसंती
तो 2020 मध्ये 189 व्या आणि 2021 मध्ये 78 व्या क्रमांकावर पोहोचला. सर्वात लोकप्रिय पासवर्ड हा शब्द 'password' आहे, जो जवळपास 5 दशलक्ष वापरकर्त्यांनी निवडला होता.
आपली डिजिटल ओळख ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मजबूत पासवर्ड (Password). मात्र, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लोक खूप साधे आणि सोपे पासवर्ड ठेवत असलेले दिसत आहेत. Samsung किंवा लोअरकेस S सह 'samsung', कमीतकमी 30 देशांमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणार्या पासवर्डपैकी एक आहे. पासवर्ड व्यवस्थापन सोल्यूशन कंपनी नॉर्डपासच्या अलीकडील अभ्यासात हे दिसून आले आहे. सॅममोबाइलच्या मते, तुमच्या स्मार्टफोन/टीव्ही/होम अप्लायन्स ब्रँडचे नाव पासवर्ड म्हणून वापरण्याची लोकप्रियता वाढली आहे.
'सॅमसंग' पासवर्डन 2019 मध्ये लोकप्रियतेच्या बाबतील 198 व्या क्रमांकावर होता. तो 2020 मध्ये 189 व्या आणि 2021 मध्ये 78 व्या क्रमांकावर पोहोचला. सर्वात लोकप्रिय पासवर्ड हा शब्द 'password' आहे, जो जवळपास 5 दशलक्ष वापरकर्त्यांनी निवडला होता. इतर सामान्यतः वापरल्या जाणार्या पासवर्डमध्ये '123456', '123456789' आणि 'guest' यांचा समावेश होतो.
अलीकडील अहवालानुसार, एक साधा आणि अंदाज लावता येण्याजोगा पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात डिक्रिप्ट केला जाऊ शकतो, तर संख्यांसह लोअरकेस आणि अप्परकेस अक्षरे असलेला पासवर्डही कमी वेळात शोधला जाऊ शकतो. या सर्व घटकांचा समावेश असलेला सात-अंकी पासवर्ड सुमारे सात सेकंदात डिक्रिप्ट केला जाऊ शकतो, तर आठ-अंकी पासवर्डसाठी सुमारे सात मिनिटे लागतात, असे अहवालात म्हटले आहे.
संशोधन फर्मने शोधून काढले की, सामान्यतः वापरले जाणारे बहुतेक पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात डिक्रिप्ट केले जाऊ शकतात, कारण ते लहान असतात आणि त्यात फक्त संख्या किंवा फक्त अक्षरे असतात. दरम्यान, भारतीय वापरकर्तेदेखील सर्वाधिक हॅक करण्यायोग्य पासवर्ड वापरत असलेले दिसून येत आहेत. यामध्ये password, password@123, password123, password@1 आणि password1 अशा शब्दांचा समावेश आहे. (हेही वाचा: Twitter कर्मचाऱ्यांना मोठा झटका, Elon Musk यांनी कर्मचाऱ्यांचे भत्ते केले कमी)
NordPass ने 2022 च्या सर्वात सामान्य पासवर्डचा अहवाल शेअर केला आहे. 2022 मध्ये जागतिक स्तरावर वापरकर्त्यांनी 4.9 दशलक्ष (49 लाख) वेळा आणि भारतात 3.4 दशलक्ष (34 लाख) वेळा ‘Password’ हा शब्द पासवर्ड म्हणून वापरला आहे.