Flipkart आणि Amazon वर 29 सप्टेंबर ला सुरु होणा-या सुपर सेलमध्ये मिळणार तुमच्या आवडत्या मोबाईल्सवर मिळतायत या जबरदस्त ऑफर्स, वाचा सविस्तर

यात फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' (The Big Billion Days) हा सेल 29 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर पर्यंत तर अॅमेझॉनवर 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' (Great Indian Sale) हा सेल देखील 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.

Flipkart and amazon Sale (Photo Credits: Facebook)

नवरात्री निमित्त ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अॅमेझॉन (Amazon) येत्या 29 सप्टेंबरपासून महासेल सुरु होणार आहे. यात फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' (The Big Billion Days) हा सेल 29 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर पर्यंत तर अॅमेझॉनवर 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' (Great Indian Sale) हा सेल देखील 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या जम्बो सेल मध्ये मोबाईल, कॅमेरा यांसारख्या गॅजेट्ससह घरगुती वापरातील वस्तूंवरही आकर्षक सूट मिळणार आहे. तसेच कपडे, सौंदर्यप्रसाधने, खेळणी यांसारख्या वस्तूंवरही विशेष सूट मिळणार आहे.

Flipkart च्या सेलमध्ये Axis Bank च्या डेबिट तसेच क्रेडिट कार्ड धारकांना तसेच ICICI Bank च्या क्रेडिट कार्डधारकांना त्वरित अतिरिक्त 10% सूट मिळणार आहे. तर Amazon च्या सेलमध्ये SBIच्या डेबिट तसेच क्रेडिट कार्ड धारकांना त्वरित अतिरिक्त 10% सूट मिळणार आहे. तसेच बोनस ऑफरही मिळणार आहे. यात मोबाईल्स Upto 40% सूट मिळणार असून फॅशन आणि त्या संबंधी लागणा-या अॅसेसरिजवर अतिरिक्त 90% सूट मिळणर आहे

पाहा फ्लिपकार्टच्या धमाकेदार ऑफर्स:

1. Realme C2 (2GB+32GB):

मूळ किंमत: 6,999 रुपये

ऑफर किंमत: 5,999 रुपये

2. Realme C2 (3GB+32GB)

मूळ किंमत: 8,999 रुपये

ऑफर किंमत: 6,999 रुपये

3. Redmi Note 7 Pro (4GB+64GB)

मूळ किंमत: 15,999 रुपये

ऑफर किंमत: 10,999 रुपये

4. Vivo Z1 Pro:

मूळ किंमत: 15,990 रुपये

ऑफर किंमत: 12,990 रुपये

5. Redmi K20 (6GB)

मूळ किंमत: 22,999 रुपये

ऑफर किंमत: 19,999 रुपये

हेही वाचा- Flipkart 'The Big Billion Days Sale': 29 ते 4 ऑक्टोबरला असणार फ्लिपकार्टचा मेगा सेल, गॅजेट्ससह घरगुती वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट

पाहा अॅमेझॉनच्या धमाकेदार ऑफर्स:

1. OnePlus 7 Pro

मूळ किंमत: 48,999 रुपये

ऑफर किंमत: 44,999 रुपये

2.Samsung Galaxy Note 9

मूळ किंमत: 73,600 रुपये

ऑफर किंमत: 42,999 रुपये

3. Redmi 7

मूळ किंमत: 9,999 रुपये

ऑफर किंमत: 5,999 रुपये

हेदेखील वाचा- Amazon Great Indian Festival: अॅमेझॉनच्या या बंपर सेल मध्ये गॅजेट्ससह अन्य वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट, 29 ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार हा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल'

4. Samsung Galaxy M3s

मूळ किंमत: 15,500 रुपये

ऑफर किंमत: 13,999 रुपये

5. Oppo K3

मूळ किंमत: 24,990 रुपये

ऑफर किंमत: 15,990 रुपये

या मोबाईल्स अशा ब-याच स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या सेलमध्ये भन्नाट आणि आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. अशा ऑफर्स ज्या आधी कधीही मिळाल्या नसतील. या ऑफर्स विषयी माहिती करुन घेण्यासाठी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या या लिंकवर जाऊन एकदा पाहाच