Micromax In 1: कमी किंमतीत मिळणार धमाकेदार फिचर्स! लवकरच मायक्रोमॅक्स कंपनीचा बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात होणार दाखल
Micromax, Micromax Smartphone, Micromax New Smartphones, Micromax In 1, Micromax In 1 Price, Micromax In 1 Featurs, मायक्रोमॅक्स, मायक्रोमॅक्स स्मार्टफोन, मायक्रोमॅक्स कंपनीचा नवा स्मार्टफोन, मायक्रोमॅक्स इन 1, मायक्रोमॅक्स इन 1 किंमत, मायक्रोमॅक्स इन 1 फिचर्स,
भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) कंपनीचा नवा आणि धमाकेदार स्मार्टफोन लवकरच बाजरात दाखल होणार आहे. ईन सीरिजमध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या स्मार्टफोनचे नाव मायक्रोमॅक्स इन 1 (Micromax In 1) ठेवण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 19 मार्चला दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होणार आहे. मायक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर लाईव्हस्ट्रिमिंगद्वारे या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनसाठी कंपनीने इंडिया का नया ब्लॉकबस्टर टॅगलाईनचा वापर केला आहे. हा स्मार्टफोन बाजारात दाखल होताच मोठी पसंती मिळवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कंपनीने मायक्रोमॅक्स इन 1 या स्मार्टफोनबाबत अधिक माहिती दिली नाही. परंतु, कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबतही कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मायक्रोमॅक्स इन 1 हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स 1 बीचा अपग्रेड व्हेरिअंट असू शकतो. मायक्रो इन 1 बीमध्ये 6.52 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. मायक्रोमॅक्स 1 बी मध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर, 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत. याचबरोबर फ्रन्ट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. यात 2 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Samsung Galaxy M02 स्मार्टफोन महागला, काय आहे नवी किंमत?
सध्या मायक्रोमॅक्स कंपनीचा इन 1 बी 6 हजार 999 तर, इन नोट 1 10 हजार 999 रुपयांत लॉन्च करण्यात आले होते. यामुळे मायक्रोमॅक्सचा इन 1 बी स्मार्टफोन 12 हजार रुपयांच्या आत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. मायक्रोमॅक्स इन 1 बी रेडमी नोट 10, पोको एम 3, इन्फिनिक्स स्मार्ट 5 यांसारख्या स्मार्टफोनला टक्कर देण्याची शक्यता आहे.