10MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन Mi10 फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स
परंतु लॉन्चिंगच्या वेळी हा स्मार्टफोन फक्त कंपनीच्या वेबसाईट आणि ई-कॉमर्स Amazon वर सेलसाठी उपलब्ध होता.
शाओमीने (Xiaomi) अधिकृत घोषणा करत Mi10 स्मार्टफो आता ई-कॉमर्स वेबासाईट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती दिली आहे. परंतु लॉन्चिंगच्या वेळी हा स्मार्टफोन फक्त कंपनीच्या वेबसाईट आणि ई-कॉमर्स Amazon वर सेलसाठी उपलब्ध होता. मात्र आता ग्राहकांना फ्लिपाकार्ट वरुन सुद्धा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. Mi 10 हा दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये 108MP चा प्रायमरी सेंसर दिला आहे.कंपनीने त्यांच्या ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, आता भारतीय युजर्ससाठी Mi 10 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे. येथे युजर्सला स्मार्टफोनसह No Cost EMI ची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे. त्याचसोबत एक्सचेंज ऑफर मध्ये सुद्धा तो खरेदी करता येणार आहे.
Mi 10 च्या 8GB+12GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 47,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर 8GB+256GB स्टोरेज मॉडेल 54,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन कोरल ग्रीन आणि ट्विलाइट ग्रे रंगात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10Os वर काम करणार आहे. तसेच Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर स्मार्टफोनसाठी दिला आहे. Mi 10 स्मार्टफोनसाठी 6.68 इंचाच फुल एचडी+3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. यासाठी स्क्रिन रेजोल्यूशन 1080X2340 पिक्सल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये युजर्सला 4780mAh ची बॅटरी मिळणार आहे.(Redmi 9 Launched In India: रेडमी कंपनीचा नवा स्मार्टफोन Redmi 9 भारतात 8,999 रुपयात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स)
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर 108MP असून ती मुख्य खासियत आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 13MP चा वाइड अँगल लेंस, 2MP चे दोन अन्य सेंसर्स सुद्धा दिले आहेत. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये देण्यात आलेले स्टोरेज सुद्धा आवश्यकतेनुसार 256GB पर्यंत वाढवता येणार आहे.