Meta ची मोठी कारवाई; Facebook, Instagram वरील 17 दशलक्षाहून अधिक आक्षेपार्ह मजकूर हटवला

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असेलेल्या पोस्ट मेटाने हटवल्या आहेत.

Photo Credit -Wikimedia Commons

Meta Remove Objectionable Content : फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर आढळलेल्या 17 दशलक्षाहून अधिक पोस्टवर मेटाने कारवाई केली आहे. खराब सामग्री मेटाने हटवली आहे. यात मेटा(Meta )ने एप्रिलमध्ये फेसबुक (Facebook) च्या 13 पॉलिसींमधील 11.6 दशलक्ष एवढी खराब सामग्री काढून टाकली आहे. तर इंस्टाग्राम(Instagram)वरील 12 पॉलिसींमधील 5.4 दशलक्षाहून अधिक आक्षेपार्ह सामग्री काढून टाकली आहे. हे आकडे एप्रिल महिन्यातील आहे. एप्रिलमध्ये, फेसबुकला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 17,124 अहवाल प्राप्त झाले होते. त्यावर कारवाई करत त्यांनी 9,977 प्रकरणांमध्ये वापरकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. (हेही वाचा:Meta: मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याबद्दल यूएस राज्यांनी मेटाविरुद्ध दाखल केला खटला )

"इतर 7,147 तक्रारींपैकी जिथे विशेष पुनरावलोकनाची आवश्यकता होती, तिथे आम्ही आमच्या धोरणांनुसार सामग्रीचे विश्लेषण केले आहे. त्यातील एकूण 4,303 सामग्रींवर कारवाई केली आहे. उर्वरित 2,844 तक्रारींचे पुनरावलोकन केले गेले परंतु कदाचित कारवाई केली गेली नाही," असे मेटाकडून सांगण्यात आले आहे.

इंस्टाग्रामवर, कंपनीला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 12,924 अहवाल प्राप्त झाले. "यापैकी, आम्ही वापरकर्त्यांना 5,941 प्रकरणांमध्ये त्यांच्या समस्यांचे निराकरण केले आहे," असे त्यात म्हटले आहे. इतर 6,983 अहवालांपैकी जेथे विशेष पुनरावलोकन आवश्यक होते, मेटाने सामग्रीचे विश्लेषण केले आणि एकूण 3,206 तक्रारींवर कारवाई केली. उर्वरित 3,777 अहवालांचे पुनरावलोकन केले गेले परंतु कदाचित कार्यवाही केली गेली नाही.