Meta Big Action In India: Facebook आणि Insta वरील कंटेंटबद्दल मेटाची भारतात मोठी कारवाई; तब्बल 19 दशलक्षाहून अधिक वाईट कंटेंट काढला

कंपन्या रिपोर्ट्सनुसार पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा कमेंट्स रिव्ह्यू करते व योग्य वाटल्यास त्यावर कारवाई करते.

Facebook, Instagram (Photo Credits: Pixabay and Wikimedia)

मेटा-मालकीची (Meta) लोकप्रिय अॅप्लिकेशन्स व्हॉट्सअॅप (Whatsaap), फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) कोट्यावधी लोक वापरतात. म्हणूनच कंपनी आपल्या नियमांबाबत खूप कडक राहते. याआधी मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपने ऑगस्टमध्ये माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांतर्गत 7,42,0,748 74 लाख खाती ब्लॉक केली होती. यापैकी 3,50,6,905 खाती वापरकर्त्यांकडून कोणतीही तक्रार येण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. आता मेटाने सांगितले की, ऑगस्टमध्ये फेसबुकच्या 13 पॉलिसींमधील 14 दशलक्षाहून अधिक कंटेंट आणि इंस्टाग्रामसाठी 12 पॉलिसींमधील 5 दशलक्ष कंटेंट काढून टाकला आहे.

गेल्या 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान, फेसबुकला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 25,049 रिपोर्ट्स प्राप्त झाले. यामध्ये त्यांनी 2,701 प्रकरणांमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. इतर 22,348 अहवालांपैकी जेथे विशेष रिव्ह्यूची आवश्यकता होती, तेथे कंपनीच्या धोरणांनुसार कंटेंट रिव्ह्यू केला गेला आणि एकूण 5,045 रिपोर्ट्सवर कारवाई केली. उर्वरित 17,303 रिपोर्ट्स रिव्ह्यू केले परंतु कारवाई केली गेली नाही.

इंस्टाग्रामवर, कंपनीला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 20,904 रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी, वापरकर्त्यांना 4,529 प्रकरणांमध्ये त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. इतर 16,375 अहवालांपैकी 6,322 रिपोर्ट्सवर विशेष रिव्ह्यू करून त्या कंटेंटवर कारवाई केली. उर्वरित 10,053 अहवालांचे पुनरावलोकन केले, मात्र कार्यवाही केली गेली नाही. (हेही वाचा: Biggest Notice: डीजीजीआयकडून दोन ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 49,000 कोटी रुपयांची नोटीस; Dream 11 चाही समावेश)

नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत, 5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला त्यांचा कंप्लायंस रिपोर्ट (Compliance Reports) प्रकाशित करावा लागतो. कंपन्या रिपोर्ट्सनुसार पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा कमेंट्स रिव्ह्यू करते व योग्य वाटल्यास त्यावर कारवाई करते. कारवाई करण्यामध्ये कंटेंट काढून टाकणे, फोटो किंवा व्हिडिओ कव्हर करणे, चेतावणी देणे इ. बाबी समाविष्ट असू शकतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif