New UPI Feature: UPI पेमेंट करणं होणार अधिक सुलभ; RBI कडून Single Block and Multiple Debits सुविधा होणार सुरू

सेवा पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम ग्राहकाच्या खात्यातून आपोआप कापली जाईल.

UPI (Photo Credits-Facebook)

New UPI Feature: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट सेवा आणखी सुधारण्यासाठी 'सिंगल ब्लॉक' (Single Block) आणि 'मल्टिपल डेबिट' (Multiple Debits) सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेअंतर्गत, ग्राहक एखाद्या व्यापाऱ्यासाठी त्याच्या बँक खात्यात निश्चित रक्कम ब्लॉक करू शकतो. सेवा पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम ग्राहकाच्या खात्यातून आपोआप कापली जाईल. ब्लॉक रक्कम म्हणजे ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रकमेचा तो भाग, जो त्याला विशिष्ट हेतूसाठी राखून ठेवायचा आहे किंवा ब्लॉक करायचा आहे.

चलनविषयक धोरणाच्या आढाव्याबद्दल माहिती देताना, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, UPI ची क्षमता वाढवून, ग्राहकांना सेवांच्या पेमेंटसाठी त्यांच्या खात्यातील रक्कम 'ब्लॉक' करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, ई-कॉमर्स आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीसाठी पेमेंट करणे सोपे होईल. (हेही वाचा -UPI Transactions: देशातील अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात युपीआय व्यवहारांमध्ये तब्बल 650 टक्के वाढ- Reports)

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात पेमेंट करणे तसेच दुय्यम भांडवली बाजारातील सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणे सोपे होईल. याचा अर्थ सामान्य माणसाला लवकरच त्याच्या खात्यातील निधी 'ब्लॉक' करण्याची आणि हॉटेल बुकिंग, भांडवली बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री अशा अनेक व्यवहारांसाठी UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे.

यामुळे व्यवहारांवर विश्वास निर्माण होईल आणि व्यापाऱ्यांना वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन मिळेल, असे आरबीआयने म्हटले आहे. सध्या, ग्राहक UPI द्वारे सिंगल ब्लॉकमध्ये म्हणजेच एका क्लिकवर पैसे भरतात. ग्राहक त्यांच्या बँक खात्यांमध्ये आवश्यकतेनुसार वजावटीसाठी निधी राखून संबंधित घटकाला पेमेंट शेड्यूल करू शकतात. (हेही वाचा - Mumbai Cyber Crime: मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, सप्टेंबर 2022 मध्ये 3,668 घटना; 1,000 घटना Online आणि Credit Card Fraud संंबंधीत)

यासंदर्भात लवकरच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ला सूचना जारी करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. दास यांनी भारत बिल पेमेंट सिस्टीम (BBPS) च्या विस्ताराची घोषणा केली आणि सर्व पेमेंट आणि संकलन समाविष्ट केले. सध्या, BBPS मध्ये वेगवेगळ्या वेळी पेमेंट करण्याची किंवा व्यक्तींना रक्कम देण्याची सुविधा नाही. दास म्हणाले की, परिणामी व्यावसायिक सेवा शुल्क भरणे, शिक्षण शुल्क, कर भरणे, भाडे संकलन हे त्याच्या कक्षेत नाही. नवीन प्रणाली BBPS प्लॅटफॉर्म व्यक्ती आणि व्यवसायांच्या विस्तृत समूहासाठी प्रवेशयोग्य बनवेल. या संदर्भात, रिझर्व्ह बँक स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल.