LinkedIn प्रोफाईलवर करता येणार Identity Verification; जाणून घ्या Feature आणि लिक्डइन ओळख पडताळणीची प्रक्रिया
आशुतोष गुप्ता पुढे म्हणाले की लिंक्डइनवर ओळख पडताळणी प्रत्येकासाठी उपलब्ध असली पाहिजे असे कंपनीचे मत आहे. म्हणूनच हे वैशिष्ट्य भारतातील आमच्या सर्व पात्र सदस्यांसाठी उपलब्ध आणि विनामूल्य असेल. LinkedIn वर, जेव्हा तुम्ही दाखवता की तुम्हीच खरे आहात, तेव्हा तुमच्याकडे आणि तुमच्या समुदायासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यावसायिक संधी शोधण्याची तुम्हाला आणखी मोठी संधी मिळेल.
सोशल नेटवर्किंग साइट LinkedIn ने बुधवारी (7 जून) भारतात त्यांच्या 100M+ सदस्यांसाठी एक नवीन ओळख पडताळणी फीचर सादर केले. लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. माहिती देताना ते म्हणाले, रोजगार शोधण्यासाठी आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी भारतीय लिंक्डइन वापरत आहेत. म्हणूनच आम्ही वापरकर्त्यांसाठी ओळख पडताळणी वैशिष्ट्य सादर केले आहे. आशुतोष गुप्ता पुढे म्हणाले की लिंक्डइनवर ओळख पडताळणी प्रत्येकासाठी उपलब्ध असली पाहिजे असे कंपनीचे मत आहे. म्हणूनच हे वैशिष्ट्य भारतातील आमच्या सर्व पात्र सदस्यांसाठी उपलब्ध आणि विनामूल्य असेल. LinkedIn वर, जेव्हा तुम्ही दाखवता की तुम्हीच खरे आहात, तेव्हा तुमच्याकडे आणि तुमच्या समुदायासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यावसायिक संधी शोधण्याची तुम्हाला आणखी मोठी संधी मिळेल.
लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्ता यांनी बुधवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, नवीन ओळख पडताळणी फीचर, जे भारतातील आमच्या 100 दशलक्षाहून अधिक सदस्यांसाठी आहे. हे फीचर तुम्हाला व्यावसायिक समुदायामध्ये विश्वास निर्माण करण्यात मदत करेल. भारतात, आयडी पडताळणी HyperVerge द्वारे केली जाते. जी एक तृतीय-पक्ष (थर्ड पार्टी) ओळख पडताळणी सेवा आहे. ही सेवा DigiLocker चा लाभ घेते. DigiLocker हे आधारसह भारतातील सरकारी आयडीसाठी डिजिटल वॉलेट (Digital Wallet आहे. ही पडताळणी वैध आधार क्रमांक असलेल्यांसाठी उपलब्ध आहे. ज्यावर तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर तुमचा भारतील फोन नंबर दाखवला जाईल. ( हेही वाचा, Best Company To Work in India: TCS भारतात काम करण्यासाठीची उत्तम कंपनी; LinkedIn चा रिपोर्ट)
लिंक्डइन ओळख पडताळणी कशी करावी?
दरम्यान, लिंक्डइन V.E.R.I.F.Y कसे करावे याबद्दल ट्यूटोरियल ब्लॉग पोस्टमध्ये सहा पायऱ्या सांगितल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:
V: तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलवरील "About this profile" पर्यायाला भेट द्या. पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी 'Verify with Aadhaar' पर्यायावर क्लिक करा.
E: Digilocker स्क्रीनवर तुमचा Aadhaar क्रमांक टाका.
R: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त करा.
I: DigiLocker वापरून Hyperverge द्वारे झटपट पडताळणी करु शकता. जर तुमच्याकडे DigiLocker खाते नसेल, तर तुम्ही त्यासाठी Automatically साइन करु शकाल.
LinkedIn हे जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म बनले आहे. ज्यामध्ये विविध उद्योग आणि स्थानांमधील लाखो वापरकर्ते आहेत. व्यावसायिकांना त्यांचे नेटवर्क तयार करण्यात आणि त्यांचे करिअर पुढे नेण्यासाठी लिंक्डइन मदत करते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)