Lenovo चे Smart Clock 2 भारतात लॉन्च, जाणून घ्या अलार्म सेट ते वॉइस कमांड देण्यापर्यंत कसे करते काम
मात्र हेच स्मार्टक्लॉक आता भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या मध्ये दोन वायरलेस चार्जिंग डॉक दिले गेले आहेत.
स्मार्टफोन निर्माती कंपनी लेनोवोने (Lenovo) गेल्या वर्षात स्मार्टक्लॉक 2 अमेरिकेत लॉन्च केले होते. मात्र हेच स्मार्टक्लॉक आता भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या मध्ये दोन वायरलेस चार्जिंग डॉक दिले गेले आहेत. त्याच्या माध्यमातून स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच चार्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त क्लॉकमध्ये 4 इंचाची एलसीडी स्क्रिन, 3 वॅटचा मिनी स्पिकर आणि एक मायक्रोफोन मिळणार आहे.(CES 2022: जगातील पहिलाच फोल्डेबल लॅपटॉप लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह अधिक)
लेनोवो स्मार्टक्लॉकमध्ये 2 मध्ये 4 इंचाची एलसीडी डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये 3 वॅटचा स्पीकर, मायक्रोफोन आणि गुगल असिस्टंटचा सपोर्ट दिला गेला आहे. युजर्सला असिस्टेंटच्या माध्यमातून ऑडिओ कॉल करण्यासह क्लॉकला कमांड देऊन अलार्म सेट करु शकता. या क्लॉकमध्ये सॉफ्ट टच फॅब्रिकचा उपयोग केला आहे. जो याला प्रिमियम लूक देतो.
लेनोवो स्मार्टक्लॉक 2 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 4.2, 2.4 गीगाहटर्ज वाय-फाय, लाइट आणि एक्सेलेरोमीटर सेंसर दिला गेला आहे. या व्यतिरिक्त क्लॉक मध्ये मीडियाटेक एमटी816एस चिपसेट, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. या स्मार्टक्लॉकची किंमत 6,999 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून हे स्मार्टक्लॉक खरेदी करता येणार आहे. फक्त ग्रे रंगाच्या कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.(Robot Judge: ऐकावे ते नवलच! China ने बनवला जगातील पहिला 'रोबोट जज'; 97 टक्के अचूक निर्णय घेण्याची क्षमता)
कंपनीच्या मते स्मार्टक्लॉक 2 मध्ये वायरसेल चार्जिंग डॉक दिला गेला आहे. याच्या माध्यमातून वायरलेस चार्जिंग डिवाइस अगदी सहज चार्ज करता येणार आहे. हे क्लॉक 10 वॅट मॅक्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. याचे वजन 298 ग्रॅम आहे.