Layoffs 2024: फिन्टेक स्टार्टअप सिंपलमध्ये टाळेबंदी; कंपनीने दुसऱ्या फेरीत 30 कर्मचाऱ्यांना काढून टाकले

कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय हा कंपनीला आर्थिकदृष्ट्या सुधारण्यासाठी आणि 2025 च्या मध्यापर्यंत चांगला नफा मिळवण्याच्या कंपनीच्या व्यापक प्रयत्नांच एक भाग आहे.

Simpl Logo (Photo Credits Official Website)

Layoffs 2024: फिनटेक स्टार्टअप सिम्पलने त्यांच्या दुसऱ्या नोकर कपातीच्या दुसऱ्या फेरीत विविध विभागांमधील 30 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय हा कंपनीला आर्थिकदृष्ट्या सुधारण्यासाठी आणि 2025 च्या मध्यापर्यंत चांगला नफा मिळवण्याच्या कंपनीच्या व्यापक प्रयत्नांच एक भाग आहे. कंपनीचे कम्युनिकेशन्सचे प्रमुख आशिष कुलश्रेष्ठ यांनी म्हटले की, 'एक संस्था म्हणून, आम्ही कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि कामात सातत्यपूर्ण वाढ करण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहोत'. (हेही वाचा:Nike Layoffs: स्पोर्ट्सवेअर कंपनी नाईकेमध्ये टाळेबंदी; नेदरलँड्समधील युरोपियन मुख्यालयातून कर्मचाऱ्यांना दिला नारळ)

"गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही आमचा व्यवसाय झपाट्याने वाढवला आहे. ही वाढ शाश्वतरीतीने चालविण्यासाठी, आम्ही ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेत आहोत," ते पुढे म्हणाले. 'प्रभावित कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या नोटिस कालावधीसाठी निश्चित पगार आणि कंपनीतील प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी 15 दिवसांचा निश्चित पगार मिळेल.'

फिनटेक स्टार्टअपने गेल्या महिन्यात पुनर्रचनेचा भाग म्हणून सुमारे 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने सुमारे 120-150 कर्मचारी कपात केली होती. आर्थिक वर्ष 23 मध्ये, सिंपलचा निव्वळ तोटा 147 टक्क्यांनी वाढून 356.6 कोटी रुपये झाला, तर परिचालन महसूल 176 टक्क्यांनी वाढून 87.3 कोटी रुपये झाला. 2016 मध्ये स्थापित, Simpl च्या प्लॅटफॉर्मवर Zomato, Makemytrip, Big Basket, 1MG आणि Crocs यासह जवळपास 26,000 व्यापारी आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif