15,000 पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत हे '4' लॅपटॉप्स !

त्यामुळेच स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉप एक महत्त्वाचे डिव्हाईस झाले आहे.

लॅपटॉप (Photo Credits: Unsplash.com)

आजकाल लॅपटॉपचा वापर विद्यार्थ्यांपासून ते ऑफिस कामांपर्यंत सर्वत्र होतो. याचे मुख्य कारण म्हणजे लॅपटॉप तुम्ही कोठेही कॅरी करु शकता. त्यामुळेच स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉप एक महत्त्वाचे डिव्हाईस झाले आहे. आजकाल बजेटमध्येही लॅपटॉप उपलब्ध आहेत. 15,000 पेक्षा कमी किंमतीत हे 4 लॅपटॉप्स उपलब्ध आहेत.... लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी खास '४' टिप्स !

आयबॉल एक्सीलेंस

या लॅपटॉपची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. या भारतीय ब्रँडच्या लॅपटॉपचा लूक आणि डिझाईन जबरदस्त आहे. यावरुन तुम्ही तुमची महत्त्वाची कामं अगदी सहज करु शकता.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास लॅपबुक

स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी मायक्रोमॅक्सच्या या लॅपबुकची किंमत 10,499 रुपये आहे. या लॅपटॉपची किंमत कमी असूनही याचे फिचर्स उत्तम आहेत. यात एचडी डिस्प्लेसोबत रॅम आणि हार्ड ड्राईव्हचा स्टोरेज देखील चांगला आहे.

आयबॉल एक्सेम्प्लेअर कॉम्पबुक

या लॅपटॉपची किंमत 13,999 रुपये आहे. यात फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला अ्सून या लॅपटॉपचे फिचर्स देखील चांगले आहेत.

जोलो क्रोमबुक

या लॅपटॉपची किंमत 12,499 रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये रॅम आणि स्टोरेज कॅपेसिटी चांगली असून इंटेल प्रोसेसर देण्यात आला आहे.