आंदोलन काळात इंटरनेट बंद ठेवल्याने प्रत्येक तासाला होते 'ऐवढ्या' रुपयांचे नुकसान!

यातील अनेक आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने मोबाईल आणि टेलिकॉम कंपन्यांना दररोज कोट्यावधी रुपयांचा फटका बसतो. इंटरनेट बंद ठेवल्याने प्रत्येक तासाला 2.5 कोटी रुपयांचे नुकसान होते.

Internet Ban (PC - File Photo)

सध्या देशातील अनेक भागांमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (Citizenship Amendment Act) आणि एनआरसीच्या (NRC) विरोधात आंदोलन सुरू आहेत. यातील अनेक आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने मोबाईल आणि टेलिकॉम कंपन्यांना दररोज कोट्यावधी रुपयांचा फटका बसतो. इंटरनेट बंद ठेवल्याने प्रत्येक तासाला 2.5 कोटी रुपयांचे नुकसान होते, असं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितलं आहे. आंदोलन काळात कोणीही अफवा पसरवू नये किंवा चुकीची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये म्हणून काही राज्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येते.

आंदोलनच्या ठिकाणी इंटनेट सेवा बंद केल्याने तेथील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना विमान तसेच रेल्वेची तिकीटे ऑनलाईन बुक करता येत नाही. तसेच ओला-उबर सारख्या खासगी प्रवासी वाहनांचे बुकिंग करता येत नाही. त्यामुळे या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते. (हेही वाचा - नवीन वर्षापासून SBI च्या ATM मधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल; OTP शिवाय काढता येणार नाहीत पैसे)

ऑनलाईन पद्धतीने बँक व्यवहार करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. इंटरनेट सुविधा बंद असल्यामुळे रुग्णालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे भरता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच ऑनलाईन पद्धतीने लाईट बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही त्यांचा मोठा फटका बसतो.