JioPhone Next स्मार्टफोन लॉन्च; 4 नोव्हेंबर पासून सेलला सुरुवात
टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी जिओ आणि इंटरनेट दिग्गज गुगलने त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन 'जिओफोन नेक्स्ट' भारतात लाँच केल्याची घोषणा शुक्रवारी केली.
टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी जिओ (Jio) आणि इंटरनेट दिग्गज गुगलने (Google) त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन 'जिओफोन नेक्स्ट' (JioPhone Next) भारतात आज लॉन्च केला आहे. दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे डिझाईन केलेला हा स्मार्टफोन फक्त 1,999 रुपयांच्या किंमतीत बुकिंगसाठी उपलब्ध असेल. उरलेली रक्कम 18 किंवा 24 महिन्यांत ईमआय (EMI) द्वारे दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन दिवाळीपासून दुकानांमध्ये उपलब्ध होईल.
ईमआयचा पर्याय जर निवडायचा नसेल तर केवळ 6,499 रुपयांना तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन देशभरात रिलायन्स रिटेलच्या JioMart डिजिटल रिटेल मध्ये उपलब्ध असेल.
"कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या सध्याच्या जागतिक आव्हानांना न जुमानता, सणासुदीच्या हंगामात भारतीय ग्राहकांपर्यंत हे यशस्वी उपकरण वेळेत पोहोचवण्यात Google आणि जिओ यशस्वी झाले याचा मला आनंद आहे. 1.35 अब्ज भारतीयांचे जीवन समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी डिजिटल क्रांतीवर माझा नेहमीच दृढ विश्वास असेल. आम्ही यापूर्वी कनेक्टिव्हिटीसह डिजिटल क्रांतीमध्ये हातभार लावला आहे. आता आम्ही ते पुन्हा स्मार्टफोन डिव्हाईस द्वारे करणार आहोत," असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले.
Reliance Jio Tweet:
"हे डिव्हाईस तयार करण्यासाठी, आमच्या कर्मचाऱ्यांनी विविध अभियांत्रिकी आणि डिझाईन आव्हाने पार पाडली आहेत. लाखो लोक त्यांचे जीवन आणि समुदाय सुधारण्यासाठी या उपकरणांचा वापर कसा करतील हे पाहण्यासाठी मी खूप उत्साही आहे," असे अंबानी म्हणाले.
जिओफोन नेक्स्ट हा भारतासाठी डिझाईन केलेला बजेट स्मार्टफोन आहे. भारतातील प्रत्येकाने इंटरनेटद्वारे निर्माण केलेल्या संधींचा लाभ घ्यावा या विचाराने मी प्रेरित आहे, असे Google आणि Alphabet चे CEO सुंदर पिचाई म्हणाले.