Jio True 5G in Pune: पुण्यात सुरू झाली रिलायन्स जिओची 5जी सेवा; मिळणार 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड
23 नोव्हेंबरपासून सुरू झालेली जिओ वेलकम ऑफर पुण्यातील सर्व जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, अमर्यादित डेटासह 1Gbps पर्यंतच्या गतीचा अनुभव देईल.
रिलायन्स जिओ (Reliance Jio) ची 5G सेवा आता पुण्यातील (Pune) लोकांसाठी उपलब्ध होणार आहेत. जिओने बुधवारी पुण्यात 1Gbps स्पीडसह अमर्यादित 5G डेटा लॉन्च केला. जिओने शहरात Jio True 5G ची बीटा सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील बहुतांश भागात स्टँडअलोन ट्रू 5जी नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वी रिलायन्स जिओने ट्रू-5जी सेवा दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि दिल्ली-एनसीआर भागात सुरू केली होती.
दिल्ली व्यतिरिक्त रिलायन्स जिओने मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि नाथद्वारामध्ये आपली सेवा सुरू केली आहे. या यादीत दिल्ली-एनसीआरनंतर पुणे सर्वात नवीन आहे. जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘12 शहरांमध्ये Jio True 5G सेवा सुरू केल्यानंतर, मोठ्या संख्येने ग्राहकांनी जिओ वेलकम ऑफरसाठी नोंदणी केली आहे. ग्राहकांचा अनुभव आणि अभिप्राय 5G नेटवर्क तयार करण्यास मदत करत आहे.’
टेलिकॉम कंपनीने सांगितले की, पुणेकरांना अमर्यादित 5G डेटासह 1 गिगाबिट्स प्रति सेकंद (Gbps) पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. अपेक्षेप्रमाणे, Jio च्या True 5G नेटवर्कवरील डेटा वापर Jio च्या 4G नेटवर्कवरील सध्याच्या डेटा वापरापेक्षा कित्येक पटीने जास्त होता. पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आणि हे शहर देशाचे आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. पुण्याचे ऑटोमोबाईल आणि उत्पादनातही मोठे स्थान आहे. म्हणून Jio True 5G खरोखरच पुण्यातील लोकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. (हेही वाचा: Most Commonly-Used Passwords: युजर्स ठेवत आहेत इतके सोपे पासवर्डस; 30 देशांमध्ये ‘Samsung’ शब्दाला पसंती)
23 नोव्हेंबरपासून सुरू झालेली जिओ वेलकम ऑफर पुण्यातील सर्व जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, अमर्यादित डेटासह 1Gbps पर्यंतच्या गतीचा अनुभव देईल.