Jio Phone 5G: लवकरच जिओ लॉन्च करेल सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
जिओ फोन 5जीच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 5000 mAh ची बॅटरी उपलब्ध असेल, ज्यामध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
भारतात 5G सेवा सुरू करण्यासोबतच दूरसंचार कंपनी जिओ आपला 5G फोन (Jio Phone 5G) घेऊन येत आहे. आता या फोनबाबत भारतीय यूजर्ससाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रिलायन्स जिओचा Jio Phone 5G लवकरच भारतीय बाजारपेठेत सादर केला जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे हा स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात 5G स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. रिलायन्स जिओच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपासूनच जिओच्या 5जी फोनबद्दल चर्चा सुरू आहे.
या बैठकीत कंपनीने जिओ 5 जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली, यासोबतच जिओ फोन 5जी लाँच करण्याची घोषणा केली. आता कंपनी लवकरच हा फोन लॉन्च करणार आहे. हा फोन गीकबेंच वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. गीकबेंचची सूची 7 डिसेंबर रोजीच आली आहे. ज्यामध्ये नवीन जिओ फोन 5G LS1654QB5 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे. लिस्टिंगमध्ये काही खास स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. यासोबतच, लिस्टिंगमध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की हा फोन Jio Phone 5G नावाने लॉन्च केला जाईल.
जिओ 5जी फोन 6.5 इंच HD Plus IPS LCD डिस्प्ले सह सादर केला जाईल. यामध्ये 60 Hz चा रिफ्रेश दर उपलब्ध असेल. त्याच वेळी, फोनला ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 480+ प्रोसेसिंग पॉवर आणि 4 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. हा फोन Android 12 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या फोनसोबत 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल. सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा असेल आणि फ्रंट 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळू शकेल. ऑलवेज-ऑन डिस्प्ले, रीड अलाउड टेक्स्ट आणि गुगल लेन्स यांसारखे फीचर्सही या फोनमध्ये असतील. (हेही वाचा: WhatsApp Update: व्हॉट्सअॅप कडून नवा फिचर लॉंच, आता कुठलाही व्हॉट्सअॅप ग्रुप शोधा फक्त एका क्लीकवर)
फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट उपलब्ध असेल. जिओ फोन 5जीच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 5000 mAh ची बॅटरी उपलब्ध असेल, ज्यामध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. चार्जिंगसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सपोर्ट असेल. या स्मार्टफोनची किंमत खूप कमी असू शकते. Contrapoints च्या रिपोर्टनुसार, हा फोन 8,000 ते 12,000 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. आता हे पाहणे बाकी आहे की रिलायन्स जिओ कंपनी गीकबेंच सूचीनंतर फोनबद्दल काय घोषणा करते.