Jio Happy New Year 2023 plans: नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जिओ वापरकर्त्यांसाठी भन्नाट ऑफर, जाणून घ्या नवे कॉलिंग-डेटा रिचार्ज प्लान आणि करा हजारोंची बचत

जिओ कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन आणि परवणारे प्लान घेवून येताना दिसतो. पण नवीन वर्षाचं निमित्त साधत २०२३ रुपयांचा हा प्लान मात्र खरचं भन्नाट आहे. तरी या प्लानमुळे तुमचे महा खर्च होणारे एकूण पैसे वाचणार असुन केवळ २०२३ रुपयांत इंटरनेटसह कॉलिंगची सेवा सहज उपभोगता येणार आहे.

Reliance Jio (Photo Credits: Twitter)

नाताळ आणि नवीन वर्षाचं मुहूर्त साधत जिओकडून जिओ सिमकार्ड धारकांसाठी काही भन्नाट कॉलिंग-डेटा रिचार्ज प्लान घेवून आला आहे. किंबहूना २०२२ हे वर्ष संपणार असुन २०२३ हे वर्ष सुरु असल्याने जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी २०२३ रुपयांचा नवा वार्षिक प्लान घेवून आला आहे. तर केवळ २०२३ रुपयांमध्ये जिओ सिम वापरकर्त्यांना जोओच्या विविध भन्नाट ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. जिओ कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन आणि परवणारे प्लान घेवून येताना दिसतो. पण नवीन वर्षाचं निमित्त साधत २०२३ रुपयांचा हा प्लान मात्र खरचं भन्नाट आहे. तरी या प्लानमुळे तुमचे महा खर्च होणारे एकूण पैसे वाचणार असुन केवळ २०२३ रुपयांत इंटरनेटसह कॉलिंगची सेवा सहज उपभोगता येणार आहे.

 

काय आहे २०२३ रुपयांचा जिओ वार्षिय रिचार्ज प्लान:-

२०२२ या वर्षाची एका आठवडाभरात सांगता होणार असुन २०२३ या नव्या वर्षात आपण प्रवेश करणार आहोत. तरी २०२३ या नव्या वर्षाचं मुहूर्त साधतचं रिलायंन्स जिओ नवा २०२३ रुपयांचा भन्नाट प्लान घेवून आला आहे. तरी या प्लाननुसार केवळ २०२३ रुपयांत तुम्हाला तब्बल ६३० जीबी अनलिमिडेट हायस्पिड डेटा दिल्या जाणार आहे. ज्यानुसार तुम्ही दिवसाला २.५ जीबी डेटा आणि अनलिमेटेड कॉलिंग करु शकणार आहे. तरी या रिचार्जची व्हॅलिडीटी नऊ महिन्यांची म्हणजेचं २७५ दिवसांची असणार आहे. तसेच या प्लानमध्ये दिवसाला १०० एसएमएस आणि सगळ्या जिओ अपच आणि अमेझॉन प्राईमचं सबस्क्रीप्शन दिल्या जाणार आहे. (हे ही वाचा:- Airtel Launches 5G Services in Pune: एअरटेलने पुण्यात सुरू केली 5G सेवा; शहरातील 'या' भागातील लोक घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद)

 

२०२३ च्या या अनोख्या रिचार्ज प्लानसह जिओ एक २९९९ रुपयांचा देखील एक नवा रिचार्ज प्लान घेवून आला आहे. तरी २९९९ रुपयांच्या या प्लानची व्हॅलिडीटी तब्बल एक वर्ष म्हणजे ३६५ दिवसांची आहे. जिओचा हा रिचार्ज प्लान पहिले देखील उपलब्ध होता पण नवीन वर्षाचं मुहूर्त साधत यांत काही विशेष आणि वाढीव ऑफर्स देण्यात आल्या आहेत. २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये १२ महिन्यांसाठी ९१२.५ जीबी एवढा डेटा देण्यात आला आहे. यानुसार प्रत्येक दिवसाला २.५ जीबी हायस्पीड डेटा वापरता येणार आहे. त्याच बरोबर यासोबत दिवसाला १०० मेसेजेस, अनलिमिटेड कॉल आणि जिओ अपचं विनामुल्य सबस्क्रीपशन मिळणार आहे. तरी वर्ष भरासाठी अगदी किफायती दरात जिओचा हा रिचार्ज प्लान उपलब्ध आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now