iPhone SE खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी, कंपनीकडून दिला जातोय भारी डिस्काउंट
iPhone SE फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या Big Saving Days सेल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. या सेलमध्ये iPhone SE स्वस्तात खरेदी करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. सेल आज (20 सप्टेंबर) रात्री 12 वाजेपर्यंत लाईव्ह असणार आहे. अशातच आज रात्रीपर्यंत फ्लिपकार्टच्या डिस्काउंट ऑफरचा फायदा घेता येणार आहे. (Apple कंपनी 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च करणार Online Store; युजर्सला होणार फायदा)
Apple iPhone SE ची किंमत 42,500 रुपये आहे. पण सेलमध्ये फोन 6500 रुपयांच्या सूटसह 35,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत खरेदीवर कंपनीकडून 17,500 रुपयांचा अधिकतम एक्सचेंज ऑफर दिला जाणार आहे. अशा प्रकारे ग्राहकांना दोन्ही ऑफरच्या माध्यमातून 24000 रुपयांच्या सूटचा फायदा घेता येणार आहे. या व्यतिरिक्त फोन नो-कॉस्ट EMI वर खरेदी सुद्धा करता येणार आहे. तर फ्लिपकार्ट Axis बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि Axis Bank Buzz क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 5 टक्क्यांची सूटाचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर iPhone च्या 125GB आणि 256GB स्टोरेज वेरियंटवर लागू आहे. (Redmi Smart Band भारतामध्ये झालं लॉन्च; किंमत 1,599 रूपये, इथे जाणून घ्या खास फीचर्स)
कंपनीकडून नुकताच iPhone SE स्मार्टफोन लेटेस्ट iOS14 ऑपरेटिंग सिस्टम अपडेट दिले आहे. फोन 4.7 इंचाचा एचडी डिस्प्लेसह येणार आहे. याचे रेज्यॉल्यूशन 750x1334 पिक्सल आहे. फोनमध्ये 64 Bit A13 बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे. स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर 12MP चा सिंगल कॅमेरा दिला आहे. याचा अपर्चर f/1.8 आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये f/2.2 अपर्चरचा 7MP चा कॅमेराद दिला गेला आहे. फोनमध्ये पॉवरबॅकअपसाठी 1624mAh ची बॅटरी दिली आहे. iPhone SE 2020 च्या कनेक्टिव्हिटी फिचर्समध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ दिला आहे. iPhone SE मध्ये टच आयडी बटन सुद्धा आहे. यामध्ये फेसआयडी दिला नसून त्यासाठी विविध सेंसर्सची गरज भासते. फोनचे डायमेंशन 138.4x67.3x7.3mm आहे. तर वजन 148 ग्रॅम आहे. फोन ब्लॅक, रेड आणि ब्लू रंगात उपलब्ध करुन दिला आहे.