iPhone Price Update: iPhone च्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवे दर आणि आजचं खरेदी करा

iPhone 13, iPhone 12 किंवा iPhone 11 खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर लगेच खरेदी करा कारण iPhone च्या किमतीत मोठी कपात करत फ्लिपकार्टकडून आयफोनवर मोठी ऑफर घोषित करण्यात आली आहे.

iPhone Price Update: iPhone च्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवे दर आणि आजचं खरेदी करा
iPhone (Photo Credits-Twitter)

iPhone वापरकर्त्यांना तसेच iPhone नव्या घेण्याऱ्यांना प्रतिक्षा होती ती iPhone14 च्या नव्या सिरिजची (Series). बरेचं दिवसांपासून iPhone14 लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च (Launch) होणार अशी चर्चा होती. पण या चर्चेवर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. अॅपल (Apple) कडून त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन (Twitter)संबंधित घोषणा करण्यात आली आहे. तरी आयफोन युजर्समध्ये (iPhone User) संबंधित लॉंन्चबाबत मोठी उत्सुक्ता दिसून येत आहे. पण iPhone 13, iPhone 12 किंवा iPhone 11 खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर लगेच खरेदी करा कारण iPhone च्या किमतीत मोठी कपात करत फ्लिपकार्टकडून (Flipkart) आयफोनवर मोठी ऑफर (iPhone Offer) घोषित करण्यात आली आहे.

 

अनेकांना आपल्या जवळ आयफोन (iPhone) असावा अशी इच्छा असते. पण आयफोनचे भाव म्हणजे गगनाला भिडलेले. सर्वसामान्यासाठी आयफोन खरीदनं म्हणजे स्वप्नचं. पण आता फ्लिपकार्ट (Flipkart) आयफोनवर विशेष ऑफर (Offer) घेवून आला आहे. iPhone 13  लाँच (Launch) केले त्यावेळी या फोनची किंमत 79 हजार 900 रुपये होती. परंतु, फ्लिपकार्टवरून (Flipkart) या फोनला 65 हजार 999 रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. म्हणजे या फोनवर तुम्ही तुमचे तब्बल 13 हजार 901 रुपयाची बचत करु शकता. (हे ही वाचा:- 6G Internet Services: आता 5G पाठोपाठ देशात 6G इंटरनेट सर्विस सुरु होणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा)

 

यासोबतच iPhone 12 आणि iPhone 11 वर देखील फ्लिपकार्ट (Flipkart) कडून मोठ्या ऑफरची (Offer) घोषणा करण्यात आली आहे. लाँच (Launch) झाला तेव्हा या फोनची (Phone) किंमत 65 हजार 900 रुपये किंमत होती. फ्लिपकार्टवरून (Flipkart) या फोनला 59 हजार 999 रुपयात खरेदी करता येवू शकतो. म्हणजे फ्लिपकार्टकडून (Flipkart) या फोनवर तब्बल 5 हजार 901 रुपयाची सुट देण्यात आली आहे. आयफोन 11 च्या लॉन्चनंतर खुद्द अपल कंपनीकडून फोनच्या किमतीत कपात करत याची किंमत 49 हजार 900 रुपये करण्यात आली होती. पण फ्लिपकार्टवर (Flipkart) आयफोन ११ (iPhone 11) ला फक्त 39 हजार 999 रुपयात तुम्ही खरेदी करू शकता.

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2022 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).