IPL Auction 2025 Live

Instagram Down: इन्स्टाग्राम डाऊन! फोटो, व्हिडिओ शेअर करताना अडचणी; फेसबुकच्या स्पष्टीकरणाकडे युजर्सचे लक्ष्य

अनेक युजर्सना फोटो, व्हिडिओ अपलोड आणि डाऊनलोड करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी काही भागांतून गुरुवारी (2 सप्टेंबर) येत आहेत. अनेक युजर्सनी इन्स्टाग्राम (Instagram ) डाऊन झाल्याच्या तक्रारींचा पाडाच सोशल मीडिया साईट ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.

Instagram | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down) झाले आहे. अनेक युजर्सना फोटो, व्हिडिओ अपलोड आणि डाऊनलोड करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी काही भागांतून गुरुवारी (2 सप्टेंबर) येत आहेत. अनेक युजर्सनी इन्स्टाग्राम (Instagram ) डाऊन झाल्याच्या तक्रारींचा पाडाच सोशल मीडिया साईट ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत. ट्विटरवर या युजर्सकडून #IntagramDown हा ट्रेंडही चालवल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या फेसबुक (Facebook) ने मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे पुढे आले नाही.

प्राप्त माहितीनुसार, इन्स्टाग्राम युजर्सकडून तक्रार केली जात आहे की, इन्स्टा पेज रिफ्रेश होत नाही. तसेच, फोटो व्हिडिओ, अपलोड आणि डाऊनलोड करातानाही अडचणी येत आहे. महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्राम आपला सर्व्हर फेसबुक आणि व्हाट्सअॅप सोबतही सामायिक करते. परंतू, व्हॉट्सँॅप आणि फेसबुक या दोन्ही अॅप अधवा साईटला कोणत्याही प्रकारची समस्या नाही. (हेही वाचा, Instagram च्या नव्या फिचरची घोषणा; Story Posts मधील पोस्ट ऑटोमेटिकली होणार ट्रान्सलेट)

ट्विट

ट्विट

सोशल मीडियावर युजर्सनी शेअर केलेल्या माहितीनुसार, भारतात इन्स्टाग्राम सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बंद (डाऊन) झाले. तर विदेशाती इन्स्टाग्राम डाऊन झाल्याच्या तक्रारी आहेत. विदेशात अनेक ठिकाणी रात्री 12.15 च्या सुमारास इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर युजर्सकडून ट्विटरवर स्क्रिनशॉट शेअर करत तक्रारींचा पाऊस पडला. दरम्यान, ही सेवा केवळ भारतापूरतीच मर्यादित स्वरुपात बंद आहे की, जगभर इन्स्टा डाऊन झाले आहे, असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे.

ट्विट

ट्विट

भारतात आतापर्यंत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि इतर शहरांतील युजर्सनी इन्स्टाग्राम बंद झाल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामचे स्वामित्व असलेल्या फेसबुकने मात्र इन्स्टाग्राम डाऊन झाल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे इन्स्टाग्राम खरोखरच डाऊन झाले आहे किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.