Infosys Salary Hike: इन्फोसीसने कर्मचाऱ्यांची पगारवाढ पुढे ढकलली- मीडिया रिपोर्ट

कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची पगावरवाढ पुढे ढकलली आहे. महत्त्वाचे असे की, इन्फोसीस (Infosys Salary Hike) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे. त्यामुळे कंपनीच्या निर्णयाचा भारतातील इतरही छोट्यामोठ्या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो.

Infosys building. (Photo Credit: Wikimedia Commons)

Infosys कंंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी काहीशी नाराज करणारी बातमी आहे. कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची पगावरवाढ पुढे ढकलली आहे. महत्त्वाचे असे की, इन्फोसीस (Infosys Salary Hike) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे. त्यामुळे कंपनीच्या निर्णयाचा भारतातील इतरही छोट्यामोठ्या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचार्‍यांसाठी साधारणत: एप्रिलपासून पगारवाढ होते. मात्र, यंता ही पगारवाढ पुढे ढकलली आहे. सध्याच्या मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणात कंपन्या ताणतणावाखाली आहेत. त्यातच कंपनीचे काही प्रकल्प बंद किंवा रद्द झाले आहेत, या पार्श्वभूमीवर ही बाब पुढे आली आहे.

इन्फोसीस कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दल लाईव्ह मिंट आणि मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना जून तिमाहीत (Q1) वेतनवाढ मिळाली नाही. तसेच, पगारवाढीला विलंब झाल्याबद्दल किंवा त्यांच्या वेतनात वाढ केव्हा मिळण्याची शक्यता आहे याबद्दल त्यांना कोणतीही सूचना कर्मचाऱ्यांना प्राप्त झालेली नाही. कंपनीने जुलैमध्ये आपल्या वरिष्ठ व्यवस्थापनाची वाढही पुढे ढकलल्याचे समजते. (हेही वाचा, फ्रेशर्सना दिलेले ऑफर लेटर Wipro, Infosys आणि Tech Mahindra कडून रद्द; मुलाखती घेऊन नोकरभरती थांबवली)

इन्फोसीस 20 जुलै रोजी सन 2023 या वर्षातील पहिल्या तिमाहिचे आकडे सार करणार आहे. या तिमाहीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 4 ते 7% महसूल वाढिसाठी आयटी प्रमुखांनी मार्गर्शन केले आहे. दरम्यान, FY18 नंतर प्रथमच कंपनीचा महसूल या मार्गदर्शित श्रेणीत असेल.

FY23 च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीने संपूर्ण संस्थेमध्ये त्याचे व्हेरीएबल पेआऊट सरासरी 60 टक्केनी कमी केले. सरासरी पेआउट 60 टक्के असताना, कर्मचार्‍याचे अंतिम व्हेरिएबल पेआउट त्यांच्या युनिट किंवा विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असेल आणि वेगवेगळ्या वेतन श्रेणी आणि विभागांसाठी बदलते.

Infosys Limited, ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सल्लागार कंपनी आहे. Infosys वित्तीय सेवा, उत्पादन, आरोग्यसेवा, किरकोळ आणि बरेच काही यासारख्या विविध उद्योगांमधील कंपन्यांना आयटी सल्ला, सॉफ्टवेअर विकास, देखभाल आणि स्वतंत्र प्रमाणीकरण सेवा यासह विविध सेवा प्रदान करते. कंपनी अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, सिस्टम इंटिग्रेशन, क्लाउड कंप्युटिंग, डेटा अॅनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या क्षेत्रात सेवा देते.

गेल्या काही वर्षांमध्ये, इन्फोसिस जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक बनली आहे. हे 46 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी विकास केंद्रे आणि कार्यालये आहेत. उत्तर अमेरिका, युरोप, आशिया पॅसिफिक आणि भारतात इन्फोसिसचे लक्षणीय अस्तित्व आहे.