Salil Parekh on Infosys Acquisitions: डेटा ॲनालिटिक्स आणि सासमध्ये इन्फोसीस करणार अधिग्रहण; सीईओ सलील पारेख यांची माहिती

पीटीआयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांनी सांगितले की, कंपनी संभाव्य अधिग्रहणांसाठी (Infosys Mergers) सक्रियपणे शोध घेत आहे.

Salil Parekh | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा कंपनी इन्फोसिस (Infosys Acquisitions) , या वर्षाच्या सुरुवातीला दोन महत्त्वपूर्ण करारांनंतर 2024 मध्ये अधिक अधिग्रहणासाठी तयारी करत आहे. पीटीआयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांनी सांगितले की, कंपनी संभाव्य अधिग्रहणांसाठी (Infosys Mergers) सक्रियपणे शोध घेत आहे. विशेषत: डेटा ॲनालिटिक्स (Data Analytics) आणि सेवा म्हणून सॉफ्टवेअर (SaaS) क्षेत्रात आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आम्ही अभियांत्रिकी सेवा दिल्या आहेत. आता आम्ही इतर क्षेत्रांवर लक्ष ठेऊन आहोत.

काय म्हणाले सलील पारेख

पारेख यांनी सूचकपणे सांगितले की, इन्फोसिस त्याच्या अलीकडील इन-टेक होल्डिंग डील प्रमाणेच एक स्केल संपादन करण्याचा विचार करत आहे. ज्याचे मूल्य अंदाजे €450 दशलक्ष (₹4,045 कोटी) आहे. जानेवारी 2024 मध्ये Infosys ने InSemi टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या भारतीय सेमीकंडक्टर डिझाईन फर्मचे ₹280 कोटींपर्यंत संपादन केल्यावर हा बदल पुढे आला आहे. एप्रिलमध्ये, इन्फोसिसने जर्मन अभियांत्रिकी R&D सेवा प्रदाता इन-टेक होल्डिंगचे अधिग्रहण करून युरोपमध्ये आपली उपस्थिती वाढवली. कंपनीने आपली वाढीची रणनीती सुरू ठेवत असताना, पारेख यांनी यावर जोर दिला की संभाव्य अधिग्रहणांचे मूल्यांकन करण्यासाठी धोरणात्मक समन्वय, आर्थिक खर्च, सांस्कृतिक फिट आणि एकत्रीकरण पैलू हे महत्त्वाचे घटक आहेत. (हेही वाचा, Infosys Delays Hiring Freshers: इन्फोसिसने 2022 मध्ये दिले 2,000 फ्रेशर्सना ऑफर लेटर, मात्र अजूनही झाले नाही जॉईनिंग; NITES ची सरकारला कंपनीवर कठोर कारवाई विनंती)

दरम्यान, इन्फोसिसने एप्रिल 2024 मध्ये सुमारे 450 दशलक्ष युरोमध्ये इन-टेक होल्डिंगमध्ये 100 टक्के हिस्सा विकत घेतला. कंपनी अभियांत्रिकी R&D सेवा प्रदान करते आणि तिचे जर्मनीमध्ये मुख्यालय आहे, असे वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पारेख यांनी म्हटले आहे की, अभियांत्रिकी सेवांमध्ये इन्फोनसिसचा आगोदरच खूप चांगला व्यवसाय आहे. पुढे आम्ही आम्ही दोन क्षेत्रांमध्ये अधिग्रहण केले. एक सेमीकंडक्टर आणि एक ऑटोमोटिव्ह.

इन्फोसिस लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय निगम आहे. जी व्यवसाय सल्ला, माहिती तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा प्रदान करते. 1981 मध्ये पुण्यातील सात अभियंत्यांनी स्थापन केलेल्या या कंपनीचे मुख्यालय आता बंगळुरु (कर्नाटक) येथे आहे. Infosys ही नव्या पिढीतील डिजिटल सेवा आणि सल्लामसलत मध्ये क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर गणल्या जाणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे काम जवळपास 55 पेक्षा अधिक देशांमध्ये चालते. क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपायांसाठी कंपनी ओळखली जाते. भारतासह जगभरातील अनेक देशांतील तरुणांना रोजगार देण्याचे काम या कंपनीने केले आहे. खास करुन आयटी क्षेत्रामध्ये या कंपनीचा विशेष दबदबा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif