Infinix Smart 5A स्मार्टफोन भारतात लॉन्च; काय आहे खासियत आणि किंमत? जाणून घ्या

9 ऑगस्टपासून या मोबाईलचा सेल फ्लिपकार्ट द्वारे सुरु होईल. हा स्मार्टफोन Infinix Smart 5 फोनचा टोन-डाऊन व्हर्जन असेल.

Infinix Smart 5A (Photo Credits: Infinix)

चायनीज स्मार्टफोन मेकर इनफिनिक्स (Infinix) ने आपला नवा स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट 5ए (Infinix Smart 5A) भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. 9 ऑगस्टपासून या मोबाईलचा सेल फ्लिपकार्ट द्वारे सुरु होईल. हा स्मार्टफोन Infinix Smart 5 फोनचा टोन-डाऊन व्हर्जन असेल. इनफिनिक्स स्मार्ट 5ए मध्ये 6.52 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात MediaTek Helio A20 प्रोसेसर असून 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे- Midnight Black, Quetzal Cyan आणि Ocean Wave.

फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13MP मेन कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (Infinix Note 10 सिरीज भारतात झाली लाँच, जाणून याची खास वैशिष्ट्ये आणि किंमतीविषयी)

Infinix India Tweet:

Infinix Smart 5A या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W च्या फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, GPS, a micro USB port, DTS Surround Sound support, a 3.5mm audio jack, rear-facing fingerprint आणि AI face unlock देण्यात आला आहे. Infinix Smart 5A स्मार्टफोनच्या 2जीबी+32जीबी वेरिएंटची किंमत 6,499 रुपये इतकी आहे.