Flipkart वर Infinix Smart 4 Plus आणि Realme Narzo 10 चा आज दुपारी 12 वाजता होणार सेल; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर Infinix Smart 4 Plus आणि Realme Narzo 10 चा सेल होणार आहे. 12,000 च्या आत किंमतीत येणा-या या स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त कॅमेरा, बॅटरी लाईफ सारखे अनेक आकर्षक फिचर्स आहेत.
नवीन स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल तर आज तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर छान संधी चालून आली आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर Infinix Smart 4 Plus आणि Realme Narzo 10 चा सेल होणार आहे. 12,000 च्या आत किंमतीत येणा-या या स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त कॅमेरा, बॅटरी लाईफ सारखे अनेक आकर्षक फिचर्स आहेत. यात Infinix Smart 4 Plus हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 889 रुपयाच्या नो कॉस्ट EMI वर खरेदी करु शकता. तर Flipkart Axis Bank Credit Card वरुन पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक मिळणार आहे. तर Realme Narzo 10 च्या खरेदीवर Flipkart Axis Bank Credit Card, Axis Bank Buzz Credit Card धारकांनां 5% डिस्काउंट मिळत आहे. त्यासोबतच यावर 6 महिन्याचे युट्यूब प्रीमियरचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. फोनमध्ये 1334 रुपयांवर नो कॉस्ट EMI खरेदी करु शकता.
Infinix Smart 4 Plus वर 6. 82 इंच डिस्प्ले देण्यात आली असून हीलियो ए-25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम 3 जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. कंपनीने इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लसची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवली आहे.
याशिवाय DTS-HD सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याती 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. VI, टेलिकॉम कंपन्या Vodafone-Idea ची नवी Brand Identity; ग्राहकांना आता myvi.in वर केलं रिडिरेक्ट
Realme Narzo 10 डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले 89.8 टक्के स्क्रिन टू बॉडी रेशियोसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनसाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच ही दिला असून दममदार परफॉर्मससाठी MediaTek Helio G80 चिपसेटसह येणार आहे. Realme Narzo 10 स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. गेमिंगसाठी हा दमदार ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 10 वर चालेल. यात ऑक्टाकोर मिडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसर मिळतो.
या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि प्रायमरी सेंसर व्यतिरिक्त यामध्ये 119 डिग्री अल्ट्रा-वाइड लेंसर, पोट्रेट लेंस आणि मॅक्रो लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. त्यासोबतच यात 5000mAh ची बॅटरी चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)