IPL Auction 2025 Live

Infinix ने भारतात लाॅन्च केले दोन दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक

कंपनीकडून इन्फिनिक्स नोट 11 सीरिज अंतर्गत जे स्मार्टफोन लॉन्च केले ते म्हणजे Infinix Note 11 आणि Infinix Note 11S.

Infinix Note 11 (Photo Credits-Twitter)

इनफिनिक्स स्मार्टफोन ब्राँन्डने भारतात Infinix Note 11 सीरिजचे दोन शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीकडून इन्फिनिक्स नोट 11 सीरिज अंतर्गत जे स्मार्टफोन लॉन्च केले ते म्हणजे Infinix Note 11 आणि Infinix Note 11S. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 11,999 रुपये आहे. तसेच येत्या 23 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. तर इन्फिनिक्स नोट 11एस स्मार्टफोनच्या 6 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर होणार आहे.(OPPO Reno 7 Pro League of Legends Edition लॉन्च, 12GB RAM, 50MP कॅमेऱ्यासह जाणून घ्या जबरदस्त फिचर्स आणि किंमतसुद्धा)

कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन प्राइस सेगमेंटच्या बेस्ट गेमिंग स्मार्टफोन पैकी एक आहेत. यामध्ये फास्ट स्पीड, अल्ट्रा स्मूथ डिस्प्लेसह फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तर इन्फिनिक्स 11 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. याची स्क्रिन टू बॉडी रेश्यो 92 टक्के आहे. याचा पीक ब्राइटनेस 750 nits आहे. तर इन्फनिक्स 11s स्मार्टफोन 6.95 इंच पंचहोल फुलएचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट दिला जाणार आहे. यामध्ये अल्ट्रा स्मूथ रिफ्रेश रेट 120 हटर्ज सपोर्ट दिला गेला आहे. TUV Rheinland सर्टिफाइड लो-ब्लू लाइट इमिशन सपोर्ट दिला जाणार आहे.

इन्फिनिक्स नोट 11 स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड XOS10 सपोर्टसह येणार आहे. इन्फिनिक्स नोट 11 सपोर्ट अॅडवान्स Helio G88 सपोर्ट दिला जाणार आहे. इन्फिनिक्स नोट 11s लेटेस्ट हिलिओ जी96 प्रोसेसर सपोर्टसह येणार आहे. यामध्ये Dar-Link 2.0 गेम बूस्ट टेक्नॉलॉजीचा सपोर्ट मिळणार आहे. इन्फिनिक्स NOTE11 चा 4GB/64GB स्टोरेज वेरियंट LPDDR4X रॅम सपोर्टसह येणार आहे. तर NOTE 11s च्या दोन्ही वेरियंटमध्ये LPDDR4X रॅम आणि USF 2.2 स्टोरेज टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे.

Infinix NOTE11 आणि NOTE 11s स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. इन्फिनिक्स नोट 11 मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. या व्यतिरिक्त 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक पोर्ट्रेट लेन्ससह येणार आहे. 50 मेगापिक्सलसह येणार आहे. सेल्फीसाठी 16 MP AI कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी सुद्धा मिळाली आहे. जो 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. इन्फिनिक्स नोट11 तीन कलर  वेरियंट Glacier Green, Celestial Snow, Graphite Black  मध्ये येणार आहे. तर NOTE 11s तीन कलर ऑप्शन Symphony Cyan, Haze Green आणि Mithril Grey मध्ये येणार आहे.