IPL Auction 2025 Live

Infinix Hot 10S स्मार्टफोन भारतात आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

हॉट 10 सिरीजमधील हा नवा स्मार्टपोन आहे. ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होणार आहे.

Infinix Hot 10S Smartphone (Photo Credits: Flipkart)

इन्फिनिक्स मोबाईलचा (Infinix Mobile) नवा हॉट 10एस (Infinix Hot 10S) स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हॉट 10 सिरीज (Hot 10 Series) मधील हा नवा स्मार्टफोन (Smartphone) आहे. ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन आज (गुरुवार, 20 मे) दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्टने या स्मार्टफोनचे फिचर्स आणि इतर महत्त्वाची माहिती दिली आहे. मात्र याची किंमत आणि उपलब्धता लॉन्चिंगनंतर जाहीर करण्यात येईल.

हा बजेट स्मार्टफोन असल्याने याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची संभावना आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध असेल- ब्लू, ग्रीन आणि व्हायलेट. (Realme ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल अधिक)

या बजेट स्मा्र्टफोनमध्ये 6.82 इंचाचा फुल एचडी+TFT ‘Ultra Smooth' डिस्प्ले  720X1640  पिक्सेल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फ्रंट कॅमेऱ्यासाठी या मोबाईलच्या डिस्प्ले मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. MediaTek Helio G85  प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे. (Redmi Note 10S भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत)

Infinix Hot 10S Smartphone (Photo Credits: Flipkart)

Infinix Hot 10S स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून  48MP ची प्रायमरी लेन्स, 2MP .सेन्सर आणि AI lens देखील देण्यात आले आहेत. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित असून यात  6,000mAh बॅटरी 62 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह देण्यात आली आहे.