India's AI Jobs Data: AI संबंधित नोकऱ्यांमध्ये भारतीयांची मागणी वाढली, नोकरीच्या पदांमध्ये 150% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे अभ्यासातून समोर
मार्च 2023 मध्ये जनरेटिव्ह एआय आणि भाषेच्या मॉडेल्समधील नोकऱ्यांच्या शोधात 2018 मधील याच महिन्याच्या तुलनेत 89% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे देखील अभ्यासात आढळून आले आहे.
जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या आगमनाने बाजारात रोजगाराच्या (Employment) अनेक संधीं निर्माण झाल्या आहेत आणि जर जॉब सर्च पोर्टलच्या (Job Search Portal ) अभ्यासाचा विचार केला तर, या क्षेत्राशी संबंधित नोकरीच्या पोस्टिंगमध्ये प्लॅटफॉर्मवर 158% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च 2023 मध्ये जनरेटिव्ह एआय आणि भाषेच्या मॉडेल्समधील (Language Models) नोकऱ्यांच्या शोधात 2018 मधील याच महिन्याच्या तुलनेत 89% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे देखील अभ्यासात आढळून आले आहे.
हा डेटा अशा वेळी आला आहे जेव्हा एआयच्या आगमनाने नोकर्या स्वयंचलित होण्याच्या संभाव्यतेबद्दल अंदाज बांधले जात आहेत. गोल्डमॅन सॅच संशोधन सूचित करते की विविध क्षेत्रातील 26% कार्ये स्वयंचलित होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने म्हटले आहे की जनरेटिव्ह एआयमध्ये क्रिएटींग आणि मार्केटींग उद्योगात प्रगत क्षमता आहेत. तथापि, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) फ्यूचर ऑफ जॉब्स अहवालात म्हटले आहे की AI मशीन लर्निंग विशेषज्ञ, वैज्ञानिक, डेटा विश्लेषक आणि डिजिटल परिवर्तन विशेषज्ञ यासारख्या प्रमुख भूमिकांना जन्म देईल.
“जागतिक AI लँडस्केपमध्ये भारत हा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे, ज्यामध्ये प्रतिभावान AI तज्ञांची संख्या वाढत आहे. भारताकडे AI साठी सर्वात मोठा टॅलेंट पूल आहे की नाही हे ठरवणे आव्हानात्मक असले तरी, देशाने या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे हे नाकारता येणार नाही. या वाढीचा एक महत्त्वाचा कारण म्हणजे भारतातील स्टीम शिक्षणावर भर देण्यात आला आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान उद्योगात कुशल प्रतिभा तयार होत आहे. शिवाय, भारताची लोकसंख्या अफाट आहे, जी मोठ्या प्रमाणावर प्रतिभासंचय उपलब्ध करून देते," असे इंडीड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार यांनी म्हटले आहे.