India bans Chinese Apps: TikTok सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर PUBG सुद्धा होणार बॅन? भारत सरकारच्या रडारवर 275 चिनी अ‍ॅप

यामध्ये अलीएक्सप्रेस (Ali Express), पबजी (PUBG) रेसोसह अन्य काहींचा समावेश आहे.

PUBG (Photo Credit: File Photo)

भारत-चीन दरम्यानच्या बॉर्डरवरील तणव अद्याप कायम आहे. लद्दाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर परिस्थिती अधिक गंभीर आणि तणावपूर्ण आहे. हेच कारण आहे ज्यामुळे भारत चीनला नुकसान पोहचवत आहे. याच दरम्यान आता केंद्रीतील मोदी सरकार यांनी काही दिवसांपूर्वी 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली. मात्र आता असे बोलले जात आहे की, चीनचे अन्य 275 अॅपवर सुद्धा एक लिस्ट बनवली जाणार असून त्यात समावेश अलेल्या अॅप बॅन केले जाणार आहेत. यामध्ये अलीएक्सप्रेस (Ali Express), पबजी (PUBG) रेसोसह अन्य काहींचा समावेश आहे.

युसी ब्राउजर, हॅलोसह 59 अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. या अॅपचा बहुसंख्येने वापर केला जातो. सिक्युरिटी संदर्भातील कारण देत या अॅपवर सरकारकडून बॅनचे आदेश देण्यात आले आहेत. आता सरकार पबजी सोबत अन्य चीनी अॅपबाबत तपास करुन असून त्यापासून राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका नाही ना याकडे लक्ष देत आहे.(TikTok, Helo सहित बॅन अ‍ॅप्सची कॉपी असणाऱ्या 'या' नव्या 47 ऍपवर केंद्र सरकारची बंदी, पहा यादी)

दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवर तणावाची परिस्थिती असताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्याचसोबत चीनला सुद्धा मोठे नुकसान या घटनेनंतर सहन करावे लागले होते. मात्र चीनकडून याबबात छुपेगिरी करण्यात आली. या संपूर्ण घटनेनंतर भारतीय नागरिकांनी चीनच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. चीनच्या विरोधात देशातील विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केले गेल्याचे दिसून आले आहे.